Pushpa 2 The Rule : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2: द रूल'नं (Pushpa 2) रिलीजच्या केवळ आठच दिवसांत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटानं जगभरात तब्बल 1067 कोटींचा गल्ला जमवला. अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं भांडवल तर फक्त पाचच दिवसांत वसूल केलं. अशातच पुष्पाच्या प्रिमीयर शोमुळे अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटकही केलीय. पण त्यापूर्वी नुकताच पुष्पा फेम अल्लू अर्जुननं दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. तिथे अल्लू अर्जुननं सर्वांचे आभार मानले, यावेळी डिस्ट्रीब्यूटर्सपासून एग्जीबिटर्सपर्यंत अनेकजण प्रेसमीटसाठी उपस्थित होते. पण, पुष्पा 2 च्या बक्कळ कमाईमुळे फक्त निर्मातेच नाहीतर अनेकांना फायदा झाला आहे. या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनच्या पतीचाही समावेश आहे. 'पुष्पा 2'च्या कामाईमुळे रविना टंडनच्या पतीची (Raveena Tondon Husbund Anil Thadani) लॉटरी लागली आहे. 


अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ने अवघ्या 8 दिवसांत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने जगभरात 1067 कोटींचा गल्ला जमवला आहे. अल्लू अर्जुन आणि निर्माते चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमानं खूप खूश आहेत. अशा परिस्थितीत डिस्ट्रीब्यूटर्स आणि एग्जीबिटर्सना मोठा फायदा झाला आहे. या यादीत रविना टंडन यांच्या पतीचाही समावेश आहे. अलिकडेच दिल्लीत झालेल्या अल्लू अर्जुनच्या पत्रकार परिषदेत रविना टंडनचे पती दिसले होते. यावेळी त्यांच्याशिवाय इतरही अनेक लोक तिथे उपस्थित होते. 


पुष्पाच्या कमाईमुळे रविना टंडनच्या पतीची लॉटरी 


रवीना टंडनचा पती अनिल थडानी सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, अनिल थडानी यांचं नाव देशातील सर्वात मोठ्या चित्रपट वितरकांमध्ये गणलं जातं. ते एए फिल्म्सचे मालक आहेत, ज्यानं 'पुष्पा 2' चं नॉर्थ इंडिया थिएट्रिकल राइट्स विकत घेतले होते. सोप्या शब्दात सांगायचं तर उत्तर भारतात 'पुष्पा 2' रिलीज करण्याचे सर्व हक्क त्यांनी विक्रमी किमतींत विकत घेतले होते. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ही किंमत 200 कोटी रुपये होती.




दरम्यान, 'पुष्पा 2' बद्दल सुरुवातीपासूनच जी चर्चा रंगली होती, ती पाहून अनिल थडानी यांना त्याचा फायदा होणारच, अशाच चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी आगाऊ तत्त्वावर इतके महागडे हक्क खरेदी केले होते. आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाचे हक्क इतक्या महागात विकले गेले नव्हते. 


अनिल थडानी काय म्हणाले?


अनिल थडानी म्हणाले की, या चित्रपटानं इतके मोठे विक्रम मोडीत काढल्याचं आश्चर्य वाटतं.  जगभरातील लोकांचे आभार मानताना दिसतायत. अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांच्या मेहनतीमुळे हे सर्व शक्य झालं आहे. यादरम्यान थडानी म्हणाले की, मी या चित्रपटाचा एक हिस्सा आहे, यासाठी मी निर्मात्यांचे आभार मानतो. लोकांचं प्रेम असंच कायम राहो आणि चित्रपटानं 2000 कोटींची कमाई करावी, ही सदिच्छा.


अनिल थडानी यांना काय फायदा?


अनिल थडानी यांची एए फिल्म्स दरवर्षी उत्तर भारतात अनेक चित्रपटांचं वितरण करते. यात केवळ बॉलिवूडच नाही तर साऊथच्या अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. आता हिंदी कलेक्शन बघितलं तर या चित्रपटानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. एकट्या हिंदीतून एकूण 425.6 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. आता वीकेंडला पुन्हा कलेक्शन वाढेल, त्यामुळे 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची खात्री करा. या चित्रपटानंतर अनिल थडानी यांनी नफा तर मिळवलाच, पण भविष्यात अनेक मोठे चित्रपट येत आहेत, ज्यासाठी त्यांना उत्तर भारताचे वितरण हक्क मिळू शकतील.


पाहा व्हिडीओ : अनिल थडानी नेमकं काय म्हणाले? 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pushpa 2 Star Allu Arjun Arrest : झुकेगा नय साला! आरामात कॉफीचा घोट घेतला, बायकोला किस केलं अन् अल्लू अर्जुन पोलिसांच्या स्वाधीन VIDEO