Pushpa 2 Box Office Collection Day 23: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2'नं (Pushpa 2 : The Rule) बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. रिलीजच्या चौथ्या आठवड्यातही हा चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहे आणि दिवसेंदिवस मोठा गल्ला जमवत आहे. पण, जसजसा चित्रपट पुढे जातोय, तसतशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये (Pushpa 2 Box Office Collection) घट दिसून येत आहे. पण, असं असूनही हा चित्रपट नव्यानं प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा जास्त गल्ला जमवत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजूनही तिकीट खिडकीवर 'पुष्पा 2' आपलं अव्वल स्थान राखून आहे. या ॲक्शन थ्रिलरनं रिलीजच्या 23 व्या दिवशी किती रुपयांचं कलेक्शन केलं? ते सविस्तर जाणून घेऊयात...
'पुष्पा 2' नं रिलीजच्या 23 व्या दिवशी किती कमाई केली?
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत अनेक विक्रम रचले आहेत आणि साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वच चित्रपटांना मागे टाकलं आहे. हा चित्रपट देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पण तरीही त्याच्या कमाईचा वेग काही थांबण्याची चिन्हं दिसेनात. वरुण धवनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या बेबी जॉनपेक्षाही हा 23 दिवस जुना चित्रपट जास्त कलेक्शन करत आहे. सध्या 'पुष्पा 2'ला कोणीही टक्कर देत नाही आणि यासोबतच हा ॲक्शन थ्रिलर दररोज यश मिळवत आहे.
या सगळ्यांमध्ये जर चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, 'पुष्पा 2' नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचं कलेक्शन 264.8 कोटी रुपये होते. तिसऱ्या आठवड्यात 'पुष्पा 2'नं 129.5 कोटींची कमाई केली आहे. आता 'पुष्पा 2'च्या रिलीजच्या 23व्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- Sakanlik च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' नं रिलीजच्या 23 व्या दिवशी 8.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- यासोबतच 'पुष्पा 2'ची 23 दिवसांची कमाई आता 1128.85 कोटींवर पोहोचली आहे.
- यामध्ये चित्रपटानं तेलगूमध्ये 320.13 कोटी रुपये, हिंदीमध्ये 731.15 कोटी रुपये, तामिळमध्ये 55.95 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.53 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 14.09 कोटी रुपये कमावले आहेत.
चौथ्या वीकेंडला 'पुष्पा 2' सगळ्यांना पछाडणार?
चौथ्या शुक्रवारी 'पुष्पा 2' च्या कमाईत घट झाली असली तरी हा चित्रपट चौथ्या वीकेंडला पुन्हा एकदा धमाल करू शकतो आणि कलेक्शन वाढवू शकतो. चौथ्या वीकेंडला 'पुष्पा 2' चमत्कार करेल आणि 1200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :