Pushpa 2: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 ) हा यंदाच्या वर्षातला मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टीझर आला, ट्रेलर आला... आता चाहते चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहे.पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी आता पुष्पा २ सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. केवळ ४ दिवस राहिलेले असताना सेन्सॉर बोर्डानं पुष्पाच्या  सीन्सवर कात्री लावत काही महत्वाचे बदल करण्यास सांगितले आहेत. गुरुवारी सेन्सॉर बोर्डानं पुष्पा २ चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्यात आले. 


पुष्पा २ पाच ठिकाणी कापला


पुष्पा २ सिनेमात अनेक अक्षेपार्ह शब्द आणि मारामारीचे काही थरारक सीन्स आता कापण्यात आले आहेत. या सीन्समध्ये असणारा हिंसाचार कथेत गरजेचा नसून केवळ अभिनेत्यावर फोकस करा म्हणजे बाकीचं दृष्य आपोआप झाकले जातील अशा सूचना केल्या आहेत. या सीन्समध्ये पुष्पा त्याच्या एका हातात तुटलेला हात घेऊन जाताना दिसतोय.


पुष्पा २ ची प्रेक्षकांना उत्सुकता


प्रत्येकजण पुष्पाचा सिक्वेल  Pushpa 2 ची वाट पाहत आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट फक्त साऊथमध्येच नाहीतर भारत आणि जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतला. आता येत्या 5 डिसेंबरला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 


 



ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरु


पुष्पा २  द रुल या चित्रपटासाठी प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत असून आजपासून (३० नोव्हेंबर) या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकींगला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट पुष्पाच्या पहिल्या भागाचाही रेकॉर्ड तोडेल अशी आशा निर्मात्यांना आहे.


श्रीलीला आणि अल्लू अर्जुन यांची जबरदस्त केमिस्ट्री


अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म पुष्पा 2 मधील नवीन गाणं 'किसिक' चेन्नईमध्ये आयोजित एका भव्य कार्यक्रमात रिलीज करण्यात आलं. या गाण्यात अभिनेत्री श्रीलीला आणि अल्लू अर्जुन यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. गाण्यामध्ये श्रीलीलाने तिच्या स्टाइल आणि शानदार डान्स मूव्ह्सने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.


पुष्पा 2 मधील आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला


पुष्पा 2 चित्रपटातील किसिक गाणं लाँच करण्यासाठी लिओ मुथु इनडोअर स्टेडियम, साई राम इंजिनिअरिंग कॉलेज येथे 24 नोव्हेंबरला पार पडला. या पुष्पा 2 वाइल्ड फायर इव्हेंटमध्ये किसिक गाण्याचं अनावरण करण्यात आलं. अल्लू अर्जुनने चित्रपटाच्या टीममधील प्रमुख सदस्यांसह चाहत्यांच्या मोठ्या गर्दीत हे गाणं लाँच करण्यात आलं. यावेळी लाइव्ह परफॉर्मन्स पार पडला, त्यावेळी चाहत्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यूट्यूबवर हे गाणं रिलीज झाल्यावर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.