Pushpa 2 Box Office Collecion Day 14: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट 'पुष्पा 2' (Pushpa 2) रिलीज होऊन 14 दिवस झाले आहेत आणि अवघ्या काही दिवसांत या चित्रपटानं भारतीय चित्रपट उद्योगातील बॉक्स ऑफिसवरील (Box Office) जवळपास सर्वच्या सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
5 डिसेंबर रोजी तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये रिलीज झालेल्या पुष्पा 2 (Pushpa 2 : The Rule) नं रिलीजच्या अकराव्या दिवशी KGF 2 (859.7 कोटी) च्या लाईफटाईम कलेक्शनला (Lifetime Collection) मागे टाकले आणि भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. या चित्रपटानं 'बाहुबली 2'चा देखील एक रेकॉर्ड मोडला. पण, दुसरा रेकॉर्ड मोडताना वाईल्ड फायर पुष्पाला देखील दिवसा तारे पाहावे लागले आहेत.
'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन
'पुष्पा 2' नं रिलीज होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच, 4 डिसेंबर रोजी 10.65 कोटी रुपये कमावलेले. यानंतर, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत चित्रपटानं दररोज कोट्यवधींची कमाई करत, अनेक दिग्गजांना दिवसा तारे दाखवले. पण, बाहुबली 2 चे रेकॉर्ड मोडताना मात्र, वाईल्ड फायर पुष्पाला दिवसा तारे दिसले आहेत. हे आकडे Secnilk वर उपलब्ध असलेल्या डेटानुसार आहेत आणि रात्री 11 वाजेपर्यंत आहेत. चित्रपटाच्या एकूण कलेक्शन आणि आजच्या कलेक्शनशी संबंधित आकडे अंतिम नाहीत. हे सुरुवातीचे आकडे असून यामध्ये बदल होऊ शकतो.
बाहुबली 2 च्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डपेक्षा पुष्पा 2 किती मागे?
'पुष्पा 2' आता वीकडेमध्ये पोहोचला आहे. यामुळे चित्रपटाची रोजची कमाई जरी कमी झाली असली, तरी आजही चित्रपट दररोज 20 कोटींहून अधिक कमाई करत आहे. पुष्पा 2 नं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले असतील, पण 2017 मध्ये एसएस राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटानं बनवलेल्या चित्रपटासमोर अजूनही डोंगरासारखा विक्रम रचला आहे.
Sacknilk च्या रिपोर्टनुसार, प्रभासचा सुपरडुपर हिट चित्रपट बाहुबली 2 नं भारतात 1030.42 कोटी रुपयांचं लाईफटाईम कलेक्शन केलं होतं. बॉक्स ऑफिसवर अजूनही सुरु असलेला पुष्पा 2 चा दबदबा पाहता हा विक्रमही लवकरच मोडीत निघेल असं वाटते आहे. खरं तर बाहुबली 2 चा लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड वाईल्ड फायर पुष्पा अगदी सहज मोडीत काढेल, असं वाटलं होतं. पण, पुष्पा 2 अजूनही बाहुबलीला मागे टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळत आहे.
चित्रपटानं मोडला बाहुबली 2 चा रेकॉर्ड
एकूण कमाईच्या बाबतीत पुष्पा 2 अजूनही बाहुबली 2 च्या मागे असला तरी हिंदीतील कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटानं प्रभासच्या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. बाहुबली 2 नं हिंदीमध्ये 510.99 कोटी रुपये कमावले होते, तर पुष्पा 2 नं आतापर्यंत हिंदीमध्ये 591.1 कोटी रुपये कमावले आहेत. पुष्पा 2 नं शाहरुख खानचा हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या जवान चित्रपटाचा विक्रमही मोडला आहे. जवानानं 582.31 कोटी रुपये कमावले होते. जी आता पुष्पा 2 च्या मागे आहे.
दरम्यान, पुष्पा 2 हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन सुकुमार आणि अल्लू अर्जुन यांनी केलं आहे, दोन्ही चित्रपटांमध्ये रश्मिका मंदाना आणि फहद फासिल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा चंदनाची तस्करी करणाऱ्या आणि सर्वात शक्तिशाली माफिया बनणाऱ्या पुष्पा राजची आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :