Pushkar Jog :  मराठी सिनेमांची सिनेमागृहातली परिस्थिती यावर अनेकदा भाष्य केल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत मराठी सिनेमांची कमाई यावर बऱ्याचदा कलाकारांकडून नाराजी व्यक्त केली जाते. अशातच आता अभिनेता पुष्कर जोगचीही (Pushkar Jog) पोस्ट चर्चेत आली आहे. काहीच दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील या परिस्थितीवर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता पुष्करनेही भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. 


पुष्करचा लवकरच धर्मा : द एआय स्टोरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेमांमध्ये पहिल्यांदाच एआयचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे मराठी सिनेमांमधला एक आगळावेगळा प्रयोग लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पण या सगळ्यात मराठी सिनेमांविषयी पुष्करची पोस्ट मात्र बरीच व्हायरल झालीये. 


पुष्करची पोस्ट नेमकी काय?


पुष्करने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की,   "महाराष्ट्र बॉलिवूडचा गड आहे हे बॉलिवूडला पण माहिती आहे. पण, याचा फटका मराठी फिल्म्सला शंभर टक्के बसतो. त्यावर इंग्लिश फिल्म्स, साऊछ इंडियन फिल्म्स. एका मराठी माणसाने फिल्म इंडस्ट्री सुरू केली, तरीही आम्हाला झिडकारल्या सारखी वागणूक नेहमीच मिळते. त्यात दुर्दैव म्हणजे याचा कोणी विचार करत नाही"


पुढे त्याने म्हटलं की, "प्रेक्षकसुद्धा मराठी मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतात. नवीन दिला तर थिएटरमध्ये जात नाहीत आणि स्टॅंडर्ड दिला की त्यावर टीका करतात". त्यामुळे मराठी सिनेमांच्या परिस्थितीवर आता पुष्करनेही खंत व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.




धर्मा: द एआय स्टोरी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला


आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' (Dharma The AI Story) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या 18ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या  पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर  जोगने केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत.                                                                            


ही बातमी वाचा : 


Ek Daav Bhootacha : एक डाव भुताचा चित्रपटाचा टीझर लाँच, स्मशानात जन्मलेल्या तरुणाची रंगतदार गोष्ट