सोशल मीडियावर शुक्रवारी सकाळपासून एका नायिकेचा फोटो व्हायरल होऊ लागला आहे. ही नायिका म्हणजे कोणी सिनेमातली नायिका नव्हे तर ही लावणी क्वीन आहे हे तिच्या हावभाव आणि रंगभूषेवरून कळतं. पण ही आहे तरी कोण असा अनेकांना पडला असेल.. ही नटी नसून हा आहे अभिनेता पुष्कर जोग.
पुष्कर जोगने आपल्या यू ट्युब चॅनलवर हा व्हिडिओ टाकला आहे. यात पुष्कर पिवळ्या साडीमध्ये नखशिखांत नटलेला आहे. आणि त्यात तो लावणी सादर करताना दिसतो. तुमच्या गिरणीचा वाजेल भोंगा.. या गाण्यावर पुष्कर थिरकला आहे. अनेकांना त्याचा हा अवतार आवडला आहे. यावेळी बोलताना पुष्कर म्हणाला, 'मला काहीतरी नवं वेगळ करून बघायचं होतं. म्हणून आपल्याच यू ट्यूब चॅनलवर आपण हे का करू नये असा विचार आला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकण्यात आला आहे.'
#MeToo च्या जाळ्यात पुन्हा अडकला साजिद खान, वयाच्या 17 व्या वर्षी शोषण केल्याचा मॉडेलचा आरोप
या व्हिडिओमधून पुष्करने आपंल नृत्यकौशल्य दाखवून दिलं आहे. हावभाव आणि पदलालित्य यामुळे हा व्हिडिओ लक्ष वेधून घेतो. पुष्करची रंगभूषाही चांगली झाली आहे. अनेकांना तो पहिल्यांना ओळखता आला नाही. सुरूवातीला कोणी स्त्रीच समोर असल्याचा भास व्हिडिओमध्ये होतो. त्याचा हा प्रयत्न व्हिडिओमधून त्याने लोकार्पण केला आहे.
पुष्कर जोग हा मराठीतला उमदा अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी सिनेमात कामं केली आहेतच. पण, तो घराघरांत पोचला तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमुळे. सतत काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात पुष्कर असतो. त्याने आपल्या यूट्युबवर टाकलेला हा व्हिडिओही त्याचा एक भाग आहे. त्याला आता रसिक कसा प्रतिसाद देतायत ते कळेल लवकरच.
Kangana Ranaut | महिलेचा छळ सुरु असताना तुम्ही गप्प कशा?, कंगना रनौतचा सोनिया गांधींना सवाल