Punit Balan Celebrity Cricket league : सेलिब्रिटी आणि क्रिकेट यांचं नातं फार अनोखं आहे. अनेक सेलिब्रिटी असे आहेत की जे क्रिकेटप्रेमी आहेत. मात्र, कामाच्या व्यापातून अनेकांना त्यांच्या आवडीला वेळ देता येत नाही. सेलिब्रिटींची हीच आवड जपण्यासाठी आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुनीत बालन सेलिब्रिटी लीगने क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं आहे. आज (19 ऑक्टोबर) रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या सीझनचा लीलाव सोहळा संपन्न झाला. 


पुनीत बालन सेलिब्रिटी लीग (PBCL) या कलाकारांच्या क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या सीजनचा लीलाव सोहळा आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पार पाडण्यात आला. या सोहळ्या दरम्यान तब्बल 100 हून अधिक मराठी सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच, (PBCL) पिबिसीएलच्या अंतिम विजेत्यांना जो चषक दिला जाणार आहे, त्याचे अनावरण राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड, जान्हवी धारीवाल बालन आणि महेश मांजरेकर, शरद केळकर, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, सुबोध भावे आणि पुनीत बालन यांच्या हस्ते झाले.


पुण्यात रंगणार स्पर्धा : 


पुनीत बालन सेलिब्रिटी लीगचा सामना पुण्यात रंगणार आहे. 11 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत हा सोहळा पाहता येणार आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघामध्ये 16 नामवंत कलाकारांचा सहभाग असेल. यामध्ये तोरणा लायन्स या संघाचं नेतृत्व पुनीत बालन, रायगड पँथर्स या संघाचे नेतृत्व प्रवीण तरडे, शिवनेरी रॉयल्स या संघाचे नेतृत्व सुबोध भावे, सिंहगड स्ट्रायकर्स या संघाचे नेतृत्व सिद्धार्थ जाधव, प्रतापगड टायगर्स या संघाचे नेतृत्व शरद केळकर आणि पन्हाळा जॅगवार्सचे नेतृत्व महेश मांजरेकर करणार आहेत.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले. प्रास्ताविक पीबीसीएलचे प्रवर्तक पुनीत बालन यांनी केले आणि राहुल क्षीरसागर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा लिलाव पार पाडला.

मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांच्या माध्यमातून रोज प्रेक्षकांना भेटणाऱ्या 100 हून अधिक कलाकार आणि तंत्रज्ञावर 6 कॅप्टन्सने बोली लावली. एखाद्या खेळाडूसाठी दोन कॅप्टन्समध्ये रंगलेली चढाओढ जेवढी चुरशीची होती तेवढीच रंजकही होती. या सोहळ्यात मराठी कलाकारांवर लाखो रुपयांच्या (पॉइंट्स स्वरूपात) बोली लागल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पुनीत बालन सेलिब्रिटी लीग साठी कलाकारांचा लिलाव संपन्न झाला.


महत्वाच्या बातम्या : 


Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये होणार जोरदार राडा; जबरा फॅन टास्कमध्ये कोण जिंकणार?