Priyanka Chopra : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाच्या चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेनं पाहात असतात. सध्या प्रियांका ही तिच्या ‘सिटाडेल’ (Citadel) या आगमी वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रियांकाचा पती निक जोनसनं (nick Jonas) नुकतच देसी गर्ल प्रियांकाला खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टचा फोटो प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रियांकाला निक जोनसनं एक खास गाडी गिफ्ट केली आहे. या गाडीचा फोटो प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केला. या गाडीवर 'मिस्टर जोनस' असं लिहिलेलं दिसत आहे. फोटोला प्रियांकानं कॅप्शन दिलं, 'ही माझी नवी राइड. थँक्यू निक, तू माझी नेहमी मदत करतो. best husband ' फोटोमध्ये प्रियांका ही गाडीच्या कलरला मॅचिंग असणाऱ्या आऊट फिटमध्ये दिसत आहे. प्रियांकाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
प्रियांकाची सिटाडेल ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. प्रियांका गेले काही दिवस या सीरिजचे शूटिंग करत आहे. या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन सीरिज आहे. तसेच प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी सिटाडेल या सीरिजच्या सेटवरील फोटो प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झालेली दिसत आहे. फोटो शेअर करुन प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमचा देखील दिवस एवढाच कठिण होता?' कॅप्शनमध्ये अॅक्टर्स लाइफ आणि Citadel या हॅशटॅगचा वापर प्रियांकानं केला आहे. प्रियांकाच्या या फोटो कमेंट करुन एका नेटकऱ्यानं विचारलं, 'चेहऱ्याला नक्की काय झालं आहे?'
प्रियांकाने शेअर केला लेकीचा फोटो
मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने रात्री उशिरा तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला होता. प्रियांका आणि निकच्या मुलीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं.
संबंधित बातम्या