एनचीनो परिसरातील हे मॅन्शन तब्बल 20,000 चौरस फूट आहे. या घरात सात बेडरुम्स आणि 11 बाथरुम आहे. यात स्विमिंग पूलही आहे. तर घरासमोर व्हॅलीचा सौंदर्य न्याहाळता येतं.
काय आहे खास?
याशिवाय घरात एन्टरटेन्मेंटसाठी बोलिंग एले, मूव्ही थिएटर, रेस्टॉरन्ट क्वॉलिटी वेट बार, इनडोर बास्केटबॉल कोर्ट, लाऊंज एरिया/गेम्स रुम आहे, तिथे पूल टेबल आणि पाहुण्यांसाठी छोटी जागा आहे. सोबतच वेगळा जिम एरिया आहे.
जो जोनासचं घरही जवळ
निक जोनासच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर त्याचा मोठा भाऊ जो जोनासचंही घर आहे. त्याने आपलं घर 14 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केला होता.
6.9 मिलियनमध्ये जुनं घर विकलं
निक जोनासने आधीचं घर 6.5 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी होतं आणि 6.9 मिलियन डॉलर्समध्ये त्याची विक्री केली होती. निकने हे घर 2018 मध्ये खरेदी केलं होतं. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. जोधपूरच्या महलात दोघे विवाहबंधनात अडकले होते. निक अमेरिकेतील प्रसिद्ध पॉपस्टार आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास बॉलिवूडसह हॉलिवूडचीही लोकप्रिय जोडी आहे. पुढील महिन्यात त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूरअण होणार आहे. बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट दिल्यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. क्वॉन्टिको वेब सीरिजच्या माध्यमातून तिने हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली. प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली असून व्हाईट टायगर चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने ती दिल्लीत आहे.