Priyadarshini Indalkar On Dashavatar Sequel: काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'दशावतार' (Dashavatar) या मराठी सिनेमानं (Marathi Movie) बॉक्स ऑफिसवर भल्या भल्या दिग्गजांच्या बॉलिवूड (Bollywood News) पटांनाही रडवलं. कोकणातला 'कांतारा' म्हणून संबोधल्या गेलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुरळाच उडवला. कोकणातलं निसर्ग सौंदर्य, संस्कृती आणि तिथल्या परंपरांचं दर्शन घडवणारा हा सिनेमा प्रेक्षकांचा निरोप घेताना मोठा संदेश देतो. अशातच आता 'दशावतार' सिनेमाचा सिक्वेल येणार का? असा प्रश्न सर्वांना पडलाय. अनेकजण तर दिग्दर्शकांना सिक्वेल काढण्यासाठी गळही घालतायत. अशातच सिनेमात वंदनाची भूमिका साकारलेली नायिका प्रियदर्शिनी इंदलकरनं (Priyadarshini Indalkar) यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनं नुकतीच 'नवशक्ती'ला मुलाखत दिली. यावेळी तिनं 'दशावतार' सिनेमाच्या सिक्वेलबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली की, "बरेच जण असंच म्हणतायेत की 'दशावतार'चा सीक्वेल यावा. माझी तर खूप इच्छा आहे. सिनेमात बाबुली काका मला हे सांगून जातात की, "भैरवीची वेळ झाली, आता पुढची जबाबदारी तुझी... तू हा लढा पुढे चालू ठेव..." यावरुन बरेच जण म्हणत आहेत की, पार्ट 2 आला तर त्यात वंदनाची भूमिका मोठी असेल. त्यामुळे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सीक्वेलचा विचार केला तर मी एका पायावर तयार आहे...."
2025 मध्ये रिलीज झालेल्या मराठी सिनेमांपैकी 'दशावतार'नं सर्वात मोठी ओपनिंग करुन मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेलंय. या सिनेमात हाफ मॅड बाबुली म्हणजेच, 81 वर्षांचे दिलीप प्रभावळकर आपल्या अभिनयानं सर्वांना वेड लावतात. त्यांचा अभिनय थेट मराठी प्रेक्षकांच्या काळजाला हात घालतो. दिलीप प्रभावळकरांव्यतिरिक्त सिनेमात महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर सिनेमात झळकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :