priya prakash varrier : सात वर्षांपूर्वी, म्हणजेच 2018 साली, इंटरनेटवर अचानक एक चेहरा सर्वत्र झळकू लागला. सगळीकडे फक्त तिचीच चर्चा होती. हा चेहरा होता एका निरागस मुलीचा, जिला तिच्या गोड हास्याने आणि डोळा मारण्याच्या स्टाईलनं लाखो लोकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर युजर्सना जणू तिचं अक्षरशः वेड लागलं होतं, मीम्सचा पूर आला होता आणि गूगल ट्रेण्ड्सवर तिचं नाव सर्वात वर होतं. ती म्हणजे प्रिया प्रकाश वारियर.
एका क्षणाने दिलं 'नॅशनल क्रश'चं टायटल
प्रिया प्रकाश वारियरचा एक छोटासा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिनं साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्या व्हिडीओत ती एका शाळकरी मुलीच्या रूपात दिसत होती — डोळ्यांत सुरमा, ओठांवर गोड हसू होतं. एवढंच पुरेसं होतं की सगळे तिच्यावर फिदा झाले. त्या व्हिडीओतलं दृश्य एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर नव्हतं, ना ती कोणती स्टार किड होती. तो फक्त एका मल्याळम गाण्याचा 10 सेकंदांचा व्हिडीओ होता — ‘माणिक्य मलाराया पूवी’. आणि त्याच व्हिडीओने प्रियाला एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं.
इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होणारी व्यक्ती
त्या काळात सगळ्यांना प्रश्न होता — "ही मुलगी कोण आहे?", "कुठून आली?", "काय करते?". ज्या काळात निक जोनास, सपना चौधरी, आणि प्रियांका चोप्रा यासारखी मोठी नावं गूगलवर ट्रेंडिंगमध्ये होती, त्यावेळी ही 18 वर्षांची मुलगी सर्वांनाच मागं टाकून भारतातील सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींपैकी एक बनली होती. तिचं ते छोटं गाणं अजूनही इंटरनेटच्या आयकॉनिक मोमेंट्सपैकी एक मानलं जातं.
सध्या काय करते प्रिया प्रकाश?
आज, सात वर्षांनंतर, प्रिया प्रकाश वारियर केवळ त्या एका व्हिडीओपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती आता एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत तिचं एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे. इंस्टाग्रामवर तिचे 7.7 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या पदार्पणाच्या 'ओरू अडार लव' या चित्रपटानंतर तिनं तमिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘इश्क’, ‘4 इयर्स’, ‘श्रीदेवी बंगला’, ‘चेक’ आणि ‘ब्रो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिनं आपल्या अभिनयाचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अलीकडे ती ‘निलावुकु एन मेल ऐन्नादी कोबम’ आणि ‘विष्णु प्रिया’ या चित्रपटांमध्येही दिसली होती.
मासूमतेपासून ग्लॅमरपर्यंत
प्रिया आता पूर्वीच्या तुलनेत खूपच ग्लॅमरस दिसते. तिच्या सौंदर्याइतकंच आकर्षण तिच्या कामगिरीतही आहे. ती केवळ एक सोशल मीडिया स्टार नाही, तर ती एक अशी अभिनेत्री बनली आहे जी प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे साकारते. आज ती अभिनयातही नित्यनेमाने सक्रिय आहे आणि तिच्या लोकप्रियतेत अजूनही घट झालेली नाही.
एका छोट्याशा गाण्याने प्रियाला मिळालेली प्रसिद्धी क्षणिक नव्हती, तर तिनं त्याचा योग्य वापर करत स्वतःचं स्थान पक्कं केलं आहे. सोशल मीडियावर आणि चित्रपटसृष्टीत तिचं अस्तित्व अजूनही तितकंच प्रभावी आहे. तिचा हा प्रवास अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या