Shantanu Moghe On Star Pravah Marathi Serial: मराठी चित्रपटसृष्टी (Marathi Industry) तसेच, हिंदी मालिकाविश्वातली (Hindi Serial) लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं 31 ऑगस्ट रोजी निधन झालं. प्रिया बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती. पण, तिचा लढा अयशस्वी ठरला आणि तिचं निधन झालं. तिच्या निधनानं मराठी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. तसेच, चाहत्यांना धक्का बसला. आपली आयुष्यभराची जोडीदार कायमची निघून गेल्यानं प्रिया मराठेचा पती अभिनेता शंतनू मोघेलाही मोठा धक्का बसला. प्रिया आजारी असल्यापासून म्हणजे, जवळपास 15 महिन्यांनी शंतनू प्रियासोबत होता. तिच्या निधनानंतर पती शंतनु मोघेला मोठा धक्का बसला. पण, आता मात्र शंतनूनं स्वतःला सावरलं असून एक कलाकार म्हणून शंतनू पुन्हा प्रेक्षकांसमोर उभा राहणार आहे. 

Continues below advertisement

प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच शंतनुने नव्या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, प्रियाच्या निधनामुळे त्याला हे काम थांबवावं लागलेलं. या मालिकेचा पहिलाच एपिसोड टेलिकास्ट झाला आणि दुसऱ्याच दिवशी प्रियाचं निधन झालं. प्रियानं या मालिकेचा पहिला एपिसोड देखील पाहिला होता. प्रियाच्या निधनाच्या आधी शंतनु मोघेने स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेत तो मंजिरीच्या भावाची भूमिका साकारत आहे. आपल्या वेदना, दुःख बाजूला सारुन 'शो मस्ट गो ऑन' म्हणत शंतनूनं आता पुन्हा एकदा मालिकेत काम करायला सुरुवात केली आहे. 

पत्नीच्या निधनानंतर 15 दिवसांतच शंतनू मोघे कामावर रूजू, काय म्हणाला?

प्रियाच्या निधनानंतर मालिकेतून कमबॅक करण्याबाबत शंतनू मोघे म्हणाला की, "मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं, म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसलो नाही. आयुष्यात आलेलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला लागलो आहे. कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे मला नेहमी सांगायचे, आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो..."

Continues below advertisement

"कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो. काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे. आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे...", असंही शंतनु म्हणाला.

स्टार प्रवाहवरच्या मालिकेतून शंतनू मोघे कमबॅक करणार आहे. भूमिकेबाबत बोलताना शंतनू म्हणाला की, "मी मालिकेत साकारत असलेली शंतनु ही भूमिका आता नकारात्मक वाटत असली तरी तशी नाहीय... विविध भावभावनांच्या छटा पाहायला मिळतील. या मालिकेच्या निमित्तानं मी स्टार प्रवाह वाहिनी, सतीश राजवाडे आणि सोल प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेचा ऋणी आहे, त्यांनी मला समजून घेतलं..." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vicky Kaushal Praises Marathi Drama: 'पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, हीच शुभेच्छा', विक्की कौशलकडून रंगभूमीवर गाजत असलेल्या मराठी नाटकाचं तोंड भरुन कौतुक