Astrology Panchang Yog 20 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 20 सप्टेंबर 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस शनिवार असल्या कारणाने हा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. आजच्या दिवशी चंद्राने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आज बुधादित्य योगासह (Yog) सुनफा योगाचाही शुभ संयोग जुळून आला आहे. त्याचप्रमाणे, कला योगही जुळून येतोय. त्यामुळे अनेक राशींसाठी हा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा संयोग जुळून आला आहे. 

Continues below advertisement


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, वैवाहिक जीवनात तुम्हाला सुख शांती मिळेल. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत वाढ झालेली दिसेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. तसेच, तुमचा व्यवसाय वाढलेला दिसेल. नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळू शकतात. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्ही पूर्ण करु शकता. नवीन गोष्टी शिकता येतील. माणसांशी गाठीभेटी होतील. 


धनु रास (Saggitarius Horoscope)


धनु राशीसाठी आजचा दिवस सुख समृद्धीचा असणार आहे. आज तुमच्यातील दानशूर वृत्ती दिसून येईल. तसेच, नशिबाची साथ तुमच्या बरोबर असेल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुमचा सहभाग दिसनू येईल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभही होण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन गोष्टींचा तुम्ही अनुभव घ्याल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबरोबर थोडे वादविवाद होऊ शकतात. मात्र, दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी नॉर्मल होतील. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Horoscope Today 20 September 2025 : आज 5 राशींना मिळणार गोड बातमी, शनिदेवाच्या कृपेने दूर होणार साडेसाती; वाचा आजचे राशीभविष्य