Priya Berde Bus Instagram Post: मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी मराठीसह हिंदी सिनेमात काम केलं. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  प्रिया बेर्डे सोशल मीडियातही सक्रिय असतात.  आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शेअर करत असतात.  अलिकडेच त्यांनी  इन्स्टाग्रामवर (Instagram Post) एक स्टोरी शेअर केली.   त्यांची स्टोरी पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  मुंबईला (Mumbai) परतत असताना त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. नेमकं काय घडलं? त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीतून (Entertainment) याची माहिती दिली.  

Continues below advertisement

प्रिया बेर्डेंची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल (Priya Berde terrifying bus journey experience)

प्रिया बेर्डे या सोशल मीडियात सक्रीय असतात. काही तासांपूर्वी  प्रिया बेर्डे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर  एक स्टोरी पोस्ट केली आहे. ही स्टोरी पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांनी अभिनेत्रीप्रति चिंता व्यक्त केली आहे.  मुंबईला परतत असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. नेमकी काय अडचण होती, याची माहिती त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीतून चाहत्यांना दिली आहे.  त्यांना अनेपक्षित संकाटाचा सामना करावा लागला.  

एका फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला बस उभी असलेली दिसत आहे. बसचे टायर्स काढण्यात आले आहे.  बसच्या चाकाला काहीतरी बिघाड झाला असल्याचं दिसत आहे. प्रवासादरम्यान, बसला काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असल्याचं  या फोटोतून अंदाज येत आहे.   तर, दुसऱ्या फोटोमध्ये बसची आतील बाजू दिसत आहे. पाय आणि बसची काच दिसत आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीला कॅप्शनही देण्यात आलं आहे. 'Coming back  to Mumbai...and How...' असं लिहिलं आहे.    या फोटोवर आणखी एका कॅप्शनने लक्ष वेधलं.   'आम्हाला वाचवण्यासाठी, स्वामी तुमचे आभार...', असं लिहिलं आहे.

Continues below advertisement

बसमधील मोठी दुर्घटना टळली, असा अंदाज या फोटोतून आणि कॅप्शनमधून येत आहे.  अनेपक्षित संकटातून प्रिया बेर्डे वाचल्या, यासाठी त्यांनी  स्वामींचे आभारही मानले.   मुंबई  गाठण्यासाठी त्यांनी सुरु केलेला प्रवास  या घटनेमुळे मध्येच थांबला होता. पण सुदैवाने दुर्घटना टळली.    सध्या प्रिया बेर्डे यांची स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, नेमकं काय घडलं, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.  पण बस आणि बसच्या बाहेर असलेलं चाक पाहून,  तांत्रिक बिघाड झाला असल्याचा अंदाज या फोटोतून येतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO