Priya Bapat Talk About First love : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नाव म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी तिने खूप कष्ट केले आहे. खूप खडतर प्रयत्नातून ती इथपर्यंत पोहोचली आहे. अलीकडे अभिनेत्रीने तिच्या स्ट्रगलबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मी अनेक वर्ष दादरच्या चाळीत राहत होते. त्या चाळीची मला खूप सवय झाली होती. ती चाळ माझे पहिले  प्रेम आहे. जगाच्या पाठीवर मी कुठेही गेले तरी मी माझ्या पहिल्या प्रेमाला विसरू शकत नाही. दादरच्या चाळीत जवळपास ती दोन दशके राहीले आहे. 


प्रिया बापटच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न होईपर्यंत ती चाळीतच राहत होती. तिथे सगळे सण आम्ही एकत्र साजरे करायचो. दिवाळी एकत्र साजरी करणं असो किंवा मित्र-मैत्रिणींसोबत खेळणं असो आम्ही सर्व काही सोबतच करायचो. ते दिवस काही निराळेच होते असेही ती म्हणाली. चाळीत सर्वांची घरे जवळ असल्याने आम्ही हक्काने एकमेकांच्या घरी जायचो आणि सगळ्यांसोबत जेवण करायचो. 


पुढे तिने सांगितले की, चाळीतल्या घरातले दरवाजे एकमेकांना जोडलेले असायचे. त्यामुळे इतरांच्या घरात जाणे फार सोपे असायचे. पण यामुळे लोकांच्या मनात आपुलकी असायची. अपार्टमेंट सिस्टममुळे लोकांमधील अंतर वाढले आहे. अभिनेत्री म्हणाली की, आज ती आलिशान घरात राहत असली तरीही चाळ हे तिचे पहिले प्रेम आहे.


संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' चित्रपटात ती एका छोट्या भूमिकेत दिसली होती. 2012 मध्ये आलेल्या 'काकस्पर्श' या मराठी चित्रपटातून तिला चांगली ओळख मिळाली. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'रफुचक्कर' या वेबसेरिजमध्ये ही ती दिसली होती. तसेच तिने काम केलेल्या  'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या (City Of Dreams 3) तिसऱ्या सीझनची चर्चा अजूनही सुरू आहे. एका कार्यक्रमादरम्यान प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य केलं होतं. 'चॉकलेट बॉय' म्हणून लोकप्रिय असलेला उमेश त्यावेळी छोटा पडदा गाजवत होता. प्रिया त्यावेळीच त्याच्या प्रेमात पडली होती. ती आधीपासूनच उमेशची फॅन होती. मराठी मनोरंजनसृष्टीतील क्यूट जोडी म्हणून आज ते दोघेही फेमस आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Meena Kumari Biopic : मीना कुमारी यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला! 'ही' अभिनेत्री झळकणार 'ट्रॅजेडी क्वीन'च्या भूमिकेत; फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचं दिग्दर्शनात पदार्पण