Prince Narula-Yuvika Chaudhary: अभिनेत्री युविका चौधरी (Yuvika Chaudhary) आणि प्रिन्स नरुला (Prince Narula) यांनी त्यांच्या घरी चिमुकल्याचं स्वागत केलं आहे. शनिवारी सायंकाळी मुलीने मुलीला जन्म दिला. त्यामुळे आता युविका आणि प्रिन्स यांच्या आयुष्यातला पालकत्वाचा प्रवास आता सुरु झाला आहे. युविका गरोदर असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेअर केली होती. त्यानंतर आता त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या अधिनंदाचा वर्षाव होतोय.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रिन्सचे वडील जोगिंदर नरुला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, होय, मुलीचा जन्म झाला आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत. युविका आणि प्रिन्स या दोघांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्याचप्रमाणे
युविका आणि प्रिन्सची लव्हस्टोरी
युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली होती. हे जोडपे बिग बॉस 9 मध्ये भेटले होते. येथूनच त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेम निर्माण झाले. या जोडप्याने 2016 मध्ये साखरपुडा केला होता.यानंतर त्यांनी दोन वर्षे डेट केले आणि नंतर 2018 मध्ये लग्न केले. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले आणि त्याची बरीच चर्चा झाली.
दरम्यान बाळाला जन्म देण्याआधी युविका आणि प्रिन्सने प्रतिक्रिया देखील दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, आम्ही ही नवीन जबाबदारी घेण्यास तयार आहोत आणि हा सुंदर टप्पा अनुभवण्यासाठी खूप उत्सुक आहोत.याशिवाय युविकाने म्हटलं होतं की, प्रिन्स आधी करिअर सेट व्हावं अशी आमची इच्छा होती. म्हणूनच आम्ही फॅमिली प्लॅनिंग पुढे ढकललं होतं. पण नंतर लक्षात आले की तुमचे शरीर आणि वय अनेक गोष्टींना साथ देत नाही.हे लक्षात येताच आम्ही बोललो आणि मग IVF चा पर्याय निवडला.
ही बातमी वाचा :