Preity Zinta On Salman Khan: प्रीती झिंटा (Preity Zinta) ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्री आहे. प्रीती झिंटाने 90च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या अभिनेत्रीने सलमान खानसोबतही (Salman Khan) अनेक चित्रपट केले. खऱ्या आयुष्यातही प्रीती आणि सलमान हे खूप चांगले मित्र आहेत. या सगळ्या दरम्यान प्रितीने सलमान खानच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत अभिनेत्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रीती झिंटाने तिच्या एक्स अकाऊंटवरुन सलमानसोबतचे काही फोटो शेअर केलेत. यावर तिने एक खास कॅप्शनही दिलं आहे. यावर प्रीतीने म्हटलं की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा सलमान खान, मला एवढेच सांगायचे आहे की मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. बाकी भेटल्यावर बोलूच.. आणि हो आपले अजून फोटो काढायला हवेत. नाहीतर मी तेच तेच जुने फोटो पोस्ट करत राहीन!
प्रीती झिंटा आणि सलमान खानला केलंय डेट?
प्रीतीने सलमान खानसाठी शेअर केलेली बर्थडे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा पाऊस पाडलाय. त्याचवेळी एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारले की तिने कधी सलमान खानला ऑफ-स्क्रीन डेट केले आहे का? चाहत्याने विचारले होते, "तुम्ही दोघे कधी डेट केलेत का?" या चाहत्याच्या प्रश्नाला अभिनेत्रीने मजेशीर उत्तर दिले. त्यावर प्रीतीने म्हटलं की, “नाही, अजिबात नाही! तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आणि माझ्या नवऱ्याचाही मित्र आहे.
धुमधडाक्यात साजरा झाला सलमान खानचा वाढदिवस
दरम्यान, सलमानने त्याची बहीण अर्पिताच्या घरी खास पद्धतीने वाढदिवस साजरा केला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. तसेच त्यानंतर सलमान खान जामनगरला त्याच्या जवळच्या मित्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी आयोजित केलेल्या भव्य वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी रवाना झाला. सलमान खानचा वाढदिवस येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
सलमान खानचं प्रोफेशनल फ्रंट
प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान त्याच्या वाढदिवशी सिकंदर या आगामी चित्रपटाचा टीझर ट्रेलर रिलीज करणार होता. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 27 डिसेंबरला हा टीझर रिलीज होऊ शकला नाही.2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
ही बातमी वाचा :
Shubhankar Tawde : चित्रपट ते नाटक...,शुभंकर तावडेसाठी या कारणामुळे ठरलं 2024 हे वर्ष खास!