Pravin Tarde : दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) नेहमी वेगवेगळ्या मुद्यांवर आपली मतं मांडत असतात. आता ते एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी पुणे आणि मुंबईत आयोजित होणाऱ्या एकांकिकांची तुलना केली आहे. चतुरंग प्रतिष्ठान पुणे (Pune) आयोजित सवाईतील निवडक एकांकिकांचा एकांकिकोत्सवास तरडे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी एकांकिकेबाबत मतं व्यक्त केलं. 


पुण्यात दोन माणसं एकमेकांशी नीट बोलताना मारामार


"मुंबईवाले म्हणजे 105 ते 110 जण त्यांच्या नाटकात आणि पुण्यात दोन माणसे एकमेकांशी नीट बोलताना मारामार त्यामुळे पुण्यातील एकाकिंका दोन जणांच्याच असायच्या. दोघांच्या वर एकांकिका करायला माणूस टिकला तर पाहिजे. त्यामुळे पुण्याची एकांकिका 2 जणांची आणि मुंबईची एकांकिका 100 जणांची असायची. अशी परिस्थिती का आहे? असा प्रश्न आम्हाला पडत होता", असे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले आहेत. प्रवीण तरडेंच्या मनोगताचे रिल इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाले आहे. 






'धर्मवीर 2' वर काम सुरु 


दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. दरम्यान, आता तरडे धर्मवीरचा सिक्वेल म्हणजेच 'धर्मवीर 2' वर काम करताना दिसत आहेत. आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल मुंबई-ठाणे या शहराच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्राला समजावे, या हेतूने सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, आता 'धर्मवीर 2'ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असे बोलले जात आहे. 


देऊळ बंद ते मुळशी पॅटर्न 


प्रवीण तरडे यांच्या देऊळ बंद आणि मुळशी पॅटर्न या सिनेमांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. एक वेळ अशी होती की, चित्रपटगृहांत तरडेंचे एकाच वेळी 2 सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मुळशी पॅटर्न या सिनेमात त्यांनी भाषेची बंधने झुगारत एक वेगळा प्रयोग केला होता. पुण्यातील गुन्हेगारीचे चित्रण या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आले होते. प्रवीण तरडे पुण्यातील एकाकिंकाच्या माध्यमातून सिनेक्षेत्रात आले. त्यामुळे नाटकांबाबत ते अनेकदा मत व्यक्त करत आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Titeeksha Tawade and Siddharth Bodke : रिल लाईफ ते रिअल लाईफ,अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिदार्थ बोडकेची लगीनघाई