Prasad Jawade Loses His Mother: मराठी सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. मराठी कलाकार प्रसाद जवादे यांच्या आईचे निधन झाले आहे. वयाच्या 65 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून प्रसाद यांची आई कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. मात्र, अखेर ही झुंज संपली. आईच्या मृत्यूनंतर प्रसाद पूर्ण खचले आहेत. दरम्यान, निधनाची बातमी प्रसाद जवादे यांची पत्नी अभिनेत्री अमृता जवादे हिने दिली. तिने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. पोस्टवर तिने सासूबद्दल भावनिक कॅप्शन लिहिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी आदरांजली वाहत शोक व्यक्त केला आहे.
अमृता जावेदने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने सासूबाईंचा फोटो शेअर केला आहे. तिनं पोस्टवर भावनिक कॅप्शन देखील लिहिलं आहे. सौ. प्रज्ञा जवादे. प्रसाद जवादे यांची आई. '15 सप्टेंबर 1960 - 28 डिसेंबर 2025. वय - 65. कळवण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, आज 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे दु:खद निधन झाले आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी धैर्य आणि सकारात्मकतेनं लढा दिला. त्या प्रेमळ आणि शांत होत्या. तसेच कुटुंबाला एकत्र ठेवण्याच्या व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यांची आठवण कायम स्मरणात राहील. व्हिल मिस यू मम्मी..'.
काही महिन्यांपूर्वी झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रसादच्या आईने हजेरी लावली होती. त्यांनी आपल्या मुलाला सप्राईज दिलं होतं. या सोहळ्यात अमृता देखील उपस्थित होती. त्याच दिवशी अमृताने प्रसादच्या आईच्या तब्येतीबाबत माहिती दिली. तसेच प्रसाद शूटिंग आणि एकत्र कसे सांभाळतो. आईची कशी काळजी घेतो. याबाबत माहिती दिली होती. अमृता म्हणाली, "गेल्या दिवाळीच्या काळात आईंना कॅन्सर झालं असल्याचं निदान झालं. त्याचं स्वप्न होतं की, प्रसादला डेलीसोपमध्ये पाहण्याची त्यांची इच्छा होती. यामुळे प्रसादने डेलीसोपमध्ये काम केलं. शूटिंगच्या धावपळीतही त्याने कधीही आई्च्या तब्येतीवरून दुर्लक्ष केलेलं नाही. आईच्या प्रत्येक ट्रिटमेंटमध्ये तो स्वत: हजर व्हायच. तो त्याच्या आईचा वडील व्हायचा. तेव्हा मी त्याची वेगळी बाजू पाहिली", असं अमृता म्हणाली.
झी मराठी पुरस्कार सोहळ्यावेळी प्रसाद यांच्या आईने मुलाचा यथोचित सन्मान पाहिला होता. तेव्हा प्रसाद यांची आई अभिमानाने म्हणाली, " माझ्या आधी हॉस्पिटलमधील सर्वांनी त्याचं नाव श्रावण बाळ ठेवलं होतं. खरोखर माझा मुलगा श्रावण बाळासारखा आहे. आधुनिक काळातला श्रावण बाळ आहे" , असं प्रसाद यांची आई म्हणाली होती. या पुरस्कार सोहळ्यावेळी प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट मुलाचे पारितोषिक मिळाले होते. पुरस्कार मिळाल्यानंतर प्रसाद यांच्या आईनं त्यांचं स्टेजवर कौतुक केलं.