Pranit More: बिग बॉसचा 19 वा सीजन आता संपला आहे. पण सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती बिग बॉसची. गेल्या शंभर दिवसांपासून प्रेक्षकांचं अफाट मनोरंजन करणारा शो संपल्याची रुखरूख प्रेक्षकांना जाणवत आहे. बिग बॉसच्या घरात प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्यात खूप जवळचा बॉन्ड दिसत असल्याचं चाहत्यांना दिसलं. असंही म्हटलं जात होतं की प्रणित आणि मालतीमध्ये प्रेमाचं नातं तयार होत आहे. दोघेही घरात असताना एकमेकांची मस्करी करताना दिसले. शेवटी भांडतानाही दिसले. मालतीचं Eviction झाल्यानं ती कुणालाही गुडबाय न करता घरातून निघून गेली. ती जाताना प्रणितवरही रागवलेली दिसली. त्यामुळे प्रणितलाही वाईट वाटलं. पण या सगळ्यात चाहत्यांना मात्र उत्सुकता आहे की खरंच प्रणित आणि मालतीमध्ये रोमँटिक नातं तयार झालं होतं का? बिग बॉसचा सिझन संपल्यानंतर प्रणित मोरेनेच या सगळ्या चाहत्यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
मलाच कळलं नाही हे रोमँटिक होतंय ..
प्रणित म्हणाला, "आमच्या दोघांच्याही बाजूने मैत्रीचंच नातं होतं. आम्ही एकत्र मजा -मस्तीही करायचो भांडायचोही. आमच्या भावनाही एकमेकांना शेअर करायचो. पण तेव्हा मला असं वाटतही नव्हतं की अँगल थोडा रोमँटिक होतंय. हे कळलं जेंव्हा तो बिग बॉसमधील जर्नी दाखवणारा व्हिडिओ समोर आला. मी बाहेर आलो तेव्हा मला कळलं की रिल्सवरही हेच सगळं सुरू होतं. लोकांना मजा येते. इकडची एखादी क्लिप तिकडे चिटकवून वेगळाच अँगल सेट करायचा. पण असं खरच कधी नव्हतं. तिच्या बाजूनेही कधी नव्हतं माझ्या बाजूनेही नव्हतं. पहिल्यापासूनच आमच्यात मैत्री होती. शेवटी आमचा जरा भांडण झालं. पण मला असं वाटतं की ते भांडणही लवकर सुटेल.
मालतीचं नाव घेऊन चिडवल्यावर प्रणित का लाजायचा ?
बिग बॉसमध्ये मालती आणि प्रणित यांच्यातील बाँन्ड बघून अनेकजण त्याला मालतीच्या नावाने चिडवू लागले होते. पण जेव्हा तिचं नाव घेऊन चिडवलं जायचं तेव्हा प्रणित लाजायचा. याविषयी उत्तर देताना तो म्हणाला " मला आणखी कोणीतरीही हा प्रश्न विचारला. पण माझं होतं काय की, माझं कधी मुलींशी इंटरॅक्शन फारसं झालेलं नाही त्यामुळे जर कोणी चिडवलं तर मी तिथे हसतो. पण मला कळत नसतं की मी हसतोय ते लाजल्यासारखं दिसतंय. माझ्या बाजूने असं कधीच काही नव्हतं. जिथे तुम्ही काम करता तिथे तुम्ही हे सगळं न केलेलं बरं असतं. " असेही तो म्हणाला.