Akshaye Khanna Dhurandhar Movie: 'धुरंधर' (Dhurandhar Movie) रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) जणू वादळंच आलंय. रिलीज झाल्यावर फक्त तीनच दिवसांत 'धुरंधर'नं 100 कोटींचा गल्ला जमा केलाय. स्पाय थ्रिलर (Spy Thriller Film) असलेल्या मल्टीस्टारर सिनेमात (Multistarrer Cinema) अनेक दिग्गज झळकले आहेत. या सिनेमात रणवीर सिंहनं (Ranveer Singh) मुख्य भूमिका साकारली आहे. तर या सिनेमात अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) साकारलेल्या रहमान बलूच, उर्फ 'रहमान डकैत' (Rehman Dakait) या भूमिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. अक्षयनं साकारलेला 'रहमान डकैत' खुंखार वाटला. पण, नेमका हा 'रहमान डकैत' कोण? खरंच पडद्यावर दिसला तसाच खुंखार, भयावह होता का 'रहमान डकैत'? त्याकाळी त्याची तेवढीच दहशत होती का? यांसारखे अनेक प्रश्न चर्चेत होते.  

आदित्य धरचा (Aditya Dhar) 'धुरंधर' हा चित्रपट खऱ्याखुऱ्या घटनांपासून प्रेरित आहे. हा चित्रपट पाकिस्तानमधील दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईचं अर्ध-काल्पनिक वर्णन करतो. हा चित्रपट 2000 च्या दशकाच्या उत्तरार्धात कराचीतील लियारी इथे घडतो. त्याकाळी लियारी गँग अॅक्टिविटीचं माहेरघर होतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अक्षय खन्नानं सिनेमात लियारीवर राज्य करणाऱ्या खुंखार 'रहमान'ची भूमिका साकारली आहे. जो त्याचा चुलत भाऊ आणि सेकंड-इन-कमांड, उजैर बलोच (दानिश पांडोर) सोबत लियारीवर राज्य करतो. रणवीर हमजा या गुप्तहेराची भूमिका साकारलीय, जो 'रहमान डकैत'च्या टोळीत घुसखोरी करतो आणि ती उध्वस्त करण्याचं काम करतो, तसेच भारतीय गुप्तचर संस्थांना आयएसआयशी असलेल्या त्यांच्या व्यवहारांबद्दल माहिती देखील पोहोचवतो.

अक्षय खन्नानं साकारलेला खुंखार 'रहमान डकैत' कोण? (Who Is Rehman Dakait)

अक्षय खन्नानं साकारलेल्या खुंखार 'रहमान डकैत'चं पूर्ण नाव सरदार अब्दुल रहमान बलूच होतं. तो एक पाकिस्तानी गँगस्टर होता, ज्याची 2000 च्या दशकात लियारीमध्ये मोठी दहशत होती. पण, लियारीत 'रहमान डकैत'ची भिती अशीच पसरली नाही. याची सुरुवात खरंतर रहमनाच्या लहानपणापासूनच झालेली. ज्या वयात मुलांना स्वतःच्या हातानं जेवायचंही कळत नाही, त्या वयात रहमानन लियारीमध्ये ड्रग्स विकायला सुरुवात केलेली. वयाच्या 13व्या वर्षी त्यानं त्याच्या आयुष्यातली पहिली हिंसा केली. त्यानं एका व्यक्तीला चाकूनं भोकसून मारलेलं. 

एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, 19 वर्षांच्या वयात रहमाननं आपल्या आईचा गळा घोटला आणि त्यानंतर पंख्याला लटकवून तिचा जीव घेतला. 'धुरंधर'च्या एका महत्त्वाच्या सीनमध्ये हे दाखवण्यात आलंय. काही क्रिएटिव्ह लिबर्टिसोबत रहमान 90 च्या दशकाच्या शेवटी हाजी लालूच्या गँगमध्ये सहभागी झाला आणि 2001 मध्ये लालूच्या अटकेनंतर गँगची कमान सांभाळली. पुढील आठ वर्ष, रहमाननं लियारीला आपला बालेकिल्ला बनवलं, उजैर आणि त्याचा सहकारी बाबा लाडला हे त्याचे विश्वासू होते. डेली गार्डियनमधील एका वृत्तानुसार, रहमानच्या आदेशानुसार, लाडला आणि बलोच त्यांच्या दुश्मनांच्या कापलेल्या मुंडक्यांनी फुटबॉल खेळून त्यांची ताकद दाखवायचे. त्या काळात लियारीमध्ये त्यांची दहशत होती. 

ऑगस्ट 2009 मध्ये लियारी टोळीवर सरकारनं केलेल्या कारवाईदरम्यान कराची पोलिसांशी झालेल्या गोळीबारात रहमान मारला गेला. त्यावेळी तो 34 वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा चुलत भाऊ उजैर यानं त्याच्या टोळीची सूत्रं हाती घेतली.

दरम्यान, 'धुरंधर'मध्ये रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्या भूमिका आहेत. सध्या 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. या सिनेमानं पहिल्या आठवड्यात जगभरात 152 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Farah Khan On Akshaye Khanna Dhurandhar Movie: 'अक्षय खन्नाला ऑस्कर मिळायलाच हवा...'; 'धुरंधर'मधल्या 'रहमान डकैत'ची बॉलिवूडच्या स्टार कोरिओग्राफरलाही भूरळ