Prakash Raj On LPG Crisis: इराण (Iran), इस्त्रायल (Israel) आणि अमेरिका (US) यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे (Iran Israel War) सध्या जगभरात तणाव निर्माण झाला आहे. युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे, त्यापैकी एक गॅसटंचाई. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात गॅसटंचाई उद्भवली आहे. अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत, तर अनेकांच्या घरातील गॅस संपला असून नव्या सिलेंडरसाठी पायपीट करावी लागत आहे. अशातच आता देशात उद्भवलेल्या एलपीजी (LPG) तुटवड्यावर अभिनेते आणि चित्रपट निर्माते प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू येथे सध्या भेडसावणाऱ्या एलपीजी (LPG) तुटवड्यावर 60 वर्षांचे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी म्हटलंय की, पुरवठ्यातील या कमतरतेचा परिणाम अनेक शहरांमधील कुटुंब, हॉटेल्स आणि अगदी स्मशानभूमींवरही होत आहे. पश्चिम आशियामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे इंधनाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. गेल्या शनिवारी, घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक सिलेंडर्सच्या किमतीत 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
"पाहुयात यावर भक्त कसे रिअॅक्ट करतात..."
देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. प्रकाश राज यांनी आपल्या पोस्टमध्ये एलपीजीच्या तुटवड्यावरुन मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलंय की, "प्रिय नागरिकांनो, जसं आता आपण पाहतोय की... घरे, हॉटेल्स आणि अगदी स्मशानभूमींवरही परिणाम होत आहे. आता यावर गोभी 'भक्तांची' प्रतिक्रिया काय आहे, ते बघायचं..."
प्रकाश राज यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
अभिनेते प्रकाश राज यांच्या पोस्टवर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरनं लिहिलंय की, "खरंच खूप वाईट परिस्थिती आहे... व्यवसाय ठप्प पडले आहेत आणि अगदी स्मशानभूमींवरही परिणाम होत आहे... ही वस्तुस्थिती या शोकांतिकेची अफाट व्याप्ती दर्शवते. संबंधित अधिकारी यावर त्वरित पावले उचलतील, अशी आशा आहे..."
दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलंय की, "तुम्हाला कदाचित याची कल्पना नसेल, पण मी तुम्हाला सांगतो की, सध्या पश्चिम आशियामध्ये एक युद्ध सुरू आहे. तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि सरकारला विविध कल्याणकारी योजना राबवण्यास भाग पडत आहे, अन्यथा, लोक त्यांना मतं देणार नाहीत. त्यामुळे, हे सर्व म्हणजे केवळ एक दुष्टचक्रच आहे..."
आणखी एकानं कमेंट करत म्हटलंय की, "एका जागतिक संकटामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे... आणि तरीही तुम्ही त्याचं रूपांतर 'भक्त विरुद्ध आम्ही' असं करत आहात... हे वेड खुद्द त्या समस्येपेक्षाही अधिक तीव्र आहे..." दुसऱ्या एकानं लिहिलंय की, "संपूर्ण जगाला याचा फटका बसलाय... प्रकाश राज यांच्या मते, आपण मंगळावर राहत आहोत की काय?"
महत्त्वाच्या इतर बातम्या :
