Priyanka Chopra On Bollywood: बॉलिवूडची (Bollywood News) देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) म्हणजे, हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Industry) गुणी अभिनेत्रींपैकी एक. पुढे प्रियांका फक्त बॉलिवूडपुरतीच मर्यादित राहिली नाही. तर, तिनं हॉलिवूडमध्येही (Hollywood News) स्वतःचं नाव कमावलं. सध्या ती बॉलिवूडपासून काहीशी दूर गेलीय, तर ती सातत्यानं हॉलिवूड प्रोजेक्ट्सवर काम करतेय. पण, हॉलिवूड सिनेमांमध्ये काम करताना, प्रियांका चोप्रानं स्वतःला बॉलिवूड चित्रपटांपासून बरंच दूर केलं आहे.
बॉलिवूडपासून दूर राहून प्रियांका चोप्रानं हॉलिवूड सिनेमांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अशा वेळी जेव्हा ती हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होती. अलिकडेच, हिंदी सिनेमांमधील तिच्या प्रवासाचा विचार करताना, तिनं पुन्हा एकदा बॉलिवूडच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वर टीका केली. प्रियांकानं कोणाचंही नाव घेतलं नाही, पण तिनं बऱ्याच गोष्टी बोलून दाखवल्या. मुलाखतीत बोलताना प्रियांका म्हणाली की, ती या घाणीत राहू शकत नाही.
बॉलिवूडबाबत प्रियांका काय म्हणाली? (Priyanka Chopra On Bollywood Dirty Politics)
प्रियांका चोप्रानं नुकतंच 'नॉट स्किनी बट फैट' (Not Skinny But Fat) पॉडकास्टमध्ये आपला आगामी सिनेमा 'थमिझन'बाबत सांगितलं आणि तिचा को-स्टार विजयवर कौतुकाचा वर्षावही केला. त्यावेळी प्रियांका म्हणाली की,"विजयला पाहण्यासाठी सेटवर मोठी गर्दी जमली तेव्हा तिला पहिल्यांदाच स्टारडमची खरी ताकद पाहायला मिळाली..." याचवेळी बोलताना प्रियंकानं असंही सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीला, तिला वाटायचं अभिनय क्षेत्र म्हणजे, प्रसिद्धी आणि लोकप्रियता... पण, हे काम खूप वेगळं असतं. कालांतरानं तिचा याबद्दलचा दृष्टिकोन बदलला.
पॉडकास्टमध्ये प्रियांकाला बॉलिवूड कारकिर्दीत आलेल्या आव्हानांमुळे तिने भारताबाहेर संधी शोधण्याचा निर्णय घेतला का? असं विचारलं गेलं. त्यावेळी तिनं बॉलिवूडच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वर निशाणा साधला.
प्रियांका चोप्रा म्हणाली की, "काहीच सहजपणे मिळत नाही. आपल्या सर्वांनाच संघर्षाचा सामना करावा लागतो. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही, जिला घाणीत लोळत राहायला आवडतं; कारण कालांतरानं, तुम्हाला त्या वासाची सवय होऊन जाते. माझा बदलावर विश्वास आहे. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, तेव्हा स्वतःला सावरण्याची, स्वतःवरील ती घाण झटकून टाकून शुद्ध होण्याची, क्षमता आपल्या सर्वांमध्ये असायला हवी. कदाचित काही काळ आपल्याला त्या वेदना जाणवतीलही... पण त्यानंतर, आपण श्रद्धेनं पुढे वाटचाल केली पाहिजे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी असं अनेकदा केलंय..."
दरम्यान, प्रियांका चोप्राच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झाल्यास, Heads of Space व्यतिरिक्त, ती एस.एस. राजामौली दिग्दर्शित Varanasi या सिनेमाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. ज्यामध्ये ती सुपरस्टार महेश बाबूसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
