Prajakta Shukre Eliminates From Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी' सीझन 6 (Bigg Boss Marathi 6) ऐन रंगात आला असतानाच, बिग बॉसनी ट्वीस्ट आणत एक-दोन नाहीतर तब्बल तीन वाईल्ड कार्ड स्पर्धक घरात पाठवले. त्यामुळे खेळाच्या पहिल्या दिवसांपासून घरात असलेल्या स्पर्धकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. अशातच आता सर्वांनी त्या तिनही वाईल्ड कार्ड स्पर्धकांसोबत आपापल्या सोयीनुसार, गरजेनुसार डिल्स केल्या असून गेम प्लान आखला आहे. त्यामुळे घरातला खेळ आणखी रंगात आला आहे. त्यात ड्रामा क्वीन राखी सावंत तर आहेच, त्यामुळे बिग बॉसचं घर चांगलंच गजबजून गेलं आहे. पण, आता विकेंड आला असून आज घरातून एक स्पर्धक एलिमिनेट होणार आहे. सोशल मीडियावर या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकाच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

'बिग बॉस मराठी 6' मध्ये ट्वीस्टचा भडिमार दिसतोय. गेल्या आठवड्यात रुचिता जामदार जिला अनेकजण ट्रॉफीची दावेदार समजत होते, ती घराबाहेर गेली आणि घरातल्यांसह अगदी प्रेक्षकांनाही धक्का बसला. त्यापूर्वीही अनेक दमदार स्पर्धक घराबाहेर गेले. त्यामुळे ज्याचा गेम दिसणार नाही, त्याचा पत्ता कट होणार, हे एव्हाना स्पर्धकांना कळून चुकलंय. तरीसुद्धा घरातील अनेक स्पर्धक फक्त गॉसिप करतायत, त्यांचा गेम काही केल्या दिसेना झालाय. अनेकदा भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ स्पर्धकांची कानउघडणीही करतोय, पण तरीसुद्धा स्पर्धक आपल्यातच रममान आहेत. अशाच एका स्पर्धकाला आता घरातून बाहेर पडावं लागणार आहे. ती स्पर्धक म्हणजे, प्राजक्ता शुक्रे (Prajakta Shukre). 

प्राजक्ताचा बिग बॉसमध्ये गेम दिसत नाहीये. हे घरातील सदस्यांना नव्हेच तर प्रेक्षकांनाही दिसून आलं आहे. त्यामुळे आता प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या नवव्या आठवड्यात एलिमिनेट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. घरातून एलिमिनेट होणाऱ्या स्पर्धकांमध्ये प्राजक्ताचं नाव आल्यामुळे सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. काहीजण प्राजक्ता घराबाहेर जाणार असल्यामुळे खूप आनंदी आहेत. तर, काहीजण निराश झाले आहेत.

Continues below advertisement

प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट? 

गोड गळ्याच्या प्राजक्ता शुक्रेनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आणि तिचे चाहते फारच खूश दिसत होते. सुरुवातीपासूनच तिनं कधी कोणाशीच वाद घातला नाही. कधीच मोठमोठ्यानं आरडाओरडा करुन कोणालाही त्रास दिला नाही. घरातल्यांनी तर तिला 'आयुर्वेदिक' असं नावंही ठेवलेलं. पण, प्राजक्ताला बिग बॉसच्य घरात गेम खेळता आला नाही, असं घरातले बोलू लागले. करण सोनावणे बिग बॉसमध्ये असताना प्राजक्ता शुक्रे त्याच्यासोबत गॉसिप करताना दिसायची. त्याचबरोबर करण आणि प्राजक्ता इतर स्पर्धकांना नावंही ठेवायचे. त्यामुळे रितेश भाऊंनीही भाऊच्या धक्क्यावर दोघांची आणि करण घराबाहेर गेल्यानंतर प्राजक्ताची कानउघडणी केली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ruchita Jamdar On Vishal kotian: 'मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय...'; बिग बॉसच्या घरात विशालसोबत रुचिताचं नाव जोडलं, ढसाढसा रडलेले वडील