Aamir Khan Girlfriend Gauri Spratt Trolled: साठीला टेकलेला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) काही महिन्यांपूर्वी आपली गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची (Gauri Spratt) मीडियासमोर सर्वांशी ओळख करुन दिली. तेव्हापासूनच इतर सेलिब्रिटींप्रमाणेच गौरी देखील पॅपाराझींच्या लिस्टमध्ये टॉपवर आली आहे. अनेकदा पॅपाराझी तिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतात. अशातच नुकतीच आमिर खानची गर्लफ्रेंड स्पॉट झालेली. त्यावेळी पॅपाराझीनं तिला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. ती दिसताच पॅपाराझी तिच्या पाठीपाठी जाऊ लागला. पण, इतरवेळी शांत दिसणारी गौरी इथे मात्र चिडली आणि पॅपाराझीवर चिडली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावरुन आता नेटकऱ्यांनी गौरीला सुनवायला सुरुवात केली आहे. तर, काहींनी गमतीशीर कमेंट केल्या आहेत. 

Continues below advertisement

गौरी स्प्रॅट काहीतरी कामानिमित्त वांद्रे इथे आलेली आणि फोटोग्राफर्सनी तिला पाहताच तिच्या भोवती गराडा घातला. त्यावेळी गौरी थोडीशी गोंधळली आणि चिडली. इंस्टाग्रामवर एका पॅपाराझी अकाउंटनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ती पॅप्सना तिथून जायला सांगतेय, तिचा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.

गौरी स्प्रॅट, पॅप्सना पाहून म्हणाली की, 'कहां से आते हैं...' व्हिडीओमध्ये, गौरी स्प्रॅट म्हणत असल्याचं दिसतंय की, "तुम्ही कुठून आलात? तुम्ही माझ्या मागे येत आहात? मला एकटं सोडा..." त्यावेळी ती दोन बॉडीगार्ड्ससोबत दिसली. दरम्यान, आतापर्यंत सर्वांनी शांत, सोज्वळी गौरीला पाहिलेलं. जेव्हा-जेव्हा गौरी कॅमेऱ्यासमोर आली, तेव्हा-तेव्हा ती एकदम शांत भासली. पण, पॅपाराझींवर चिडतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. तसं पाहायला गेलं तर, यापूर्वीही गौरी एका पॅपाराझींना दिसलेली, त्यावेळी त्यांन तिच्याकडे एक फोटो देण्याची विनंती केली. पण, तिनं स्पष्ट नकार दिलेला. तशी गौरी स्वतःला लाईमलाईटपासून दूरच ठेवते. 

आमिर खानच्या गर्लफ्रेंडच्या व्हिडीओवर नेटकरी चवताळले... 

सध्या सोशल मीडियावर गौरी स्प्रॅटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर गमतीशीर कमेंट केल्या आहेत. तर, एका युजरनं लिहिलंय की, "स्वतःच सांगतेस पॅपाराझींना...", तर आणखी एका युजरनं लिहिलंय की, "आमिर खानची गर्लफ्रेंड बनताना लाज नाही वाटली... आता त्यांना बोलतेयस की, कुठून येतात हे लोक... कधी आमिरलाही विचारुन बघ असा प्रश्न..." दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, "दुसऱ्या ग्रहावरुन थोडीच आलेत...", तर, एकानं लिहिलंय की, "घरूनच येतात...". दरम्यान, आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या वयात तब्बल 14 वर्षांचं अंतर आहे. आमिर खाननं वयाची साठी गाठली आहे. तर, गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट 46 वर्षांची आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mahima Chaudhary Sanjay Mishra Viral Video: 52 वर्षांच्या महिमा चौधरीनं, 62 वर्षांच्या संजय मिश्रांसोबत बांधली लग्नगाठ? पॅपाराझींसमोर नवविवाहित जोडप्याप्रमाणे दिल्या पोज