Prajakta Mali : मराठी सिनेसृष्टी असो किंवा बॉलिवूड सुरुवातीच्या प्रत्येक अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला मोठा संघर्ष करावा लागतो. सिनेसृष्टीत यश मिळवणे, नाव कमावणे, ही देखील सोपी गोष्ट राहिलेली नाही. मराठी सिनेसृष्टीत देखील ग्रामीण भागातून येत कारकीर्द गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री आल्या आहेत. दरम्यान, याबाबत काही कलाकार उघडपणे बोलतात देखील... अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी तिने सिनेसृष्टीतील संघर्षमय प्रवास सांगितलाय.
प्राजक्ता माळी म्हणाली, माझ्या वयाच्या 17 व्या वर्षानंतर मी आयुष्यात एकदम डेंजर काळ पाहिला. त्या काळानेच मला स्ट्राँग केलं. त्यानंतर मला कळालं तुम्ही इतके शांत राहाल तर कुठेच पाहोचू शकणार नाहीत. मी इथं आयुष्य जगायला आलीये, तर काहीतरी करुनच जाईन. मी असंच नाही मरु शकतं.
पुढे बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, "strong soul chooses the hardest life" हा कोट मला आवडतो. तशाच पद्धतीने मी काही स्ट्रगल मी स्वत:हून ओढावून देखील घेतले. माझा पुणे ते मुंबई हा स्ट्रगल देखील खूप मोठा होता. फॅमिलीचा मेंटली सपोर्ट होता. मुंबईत आजही माझा कोणी नातेवाईक राहात नाही. त्यामुळे इमोशनल आणि मेंटल स्ट्रगल करावा लागला. आर्थिक संघर्ष, जातीवाद या सगळ्यांना समोरं जावं लागलं. मी त्यातून घडत गेले.
माझ्या भूमिकांनी देखील मला मदत केली. मी संघर्षामुळे बदलले. सुरुवातीला दम-दमा-दम मध्ये मी परफॉर्म करायला यायचे. मी तेरा वेळा तिथे परफॉर्म केलंय. तेव्हा मी पुणे ते मुंबई रोजचा प्रवास करायचे. हॉटेलमध्ये राहू एवढे पैसे नव्हते. त्यानंतर गुड मॉर्निंग महाराष्ट्र होस्ट करायला घेतलं. मुंबई ते पुणे रोजच्या प्रवासामुळे आमचा 25 ते 26 तासांचा आमचा दिवस व्हायचा, असंही प्राजक्ता माळीने सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या