Marathi Actress Tanvi Patil On Experience Shooting Adult Webseries: मनोरंजन क्षेत्रातलं ग्लॅमरस जग, चकाकती दुनिया एकीकडे आणि बोल्ड, अडल्ट वेब सीरिज एकीकडे... या दोन जगात वावरणाऱ्या स्टार्सनाही कायम वेगळीच वागणूक मिळते. इंडस्ट्रीत काम करणाऱ्या टॉप अभिनेत्रींनाही आजवर बेडरूम सीन करणं चुकलेलं नाही. सिनेमाची, वेब सीरिजची गरज म्हणून अभिनेत्रींना कधीना कधी असे सीन्स द्यावेच लागतात. अनेकदा असे सीन्स करताना अवघडल्यासारखं होतं, आपसूकच अंग चोरल्यासारखं वाटतं... पण तो सीन पूर्ण करावा लागतो. शूट करताना चेहऱ्यावरच्या हावभावांवरही कंट्रोल ठेवावा लागतो. अभिनेत्रींसाठी ती वेळ, तो क्षण अवघडलेपण आणणारा असतो, अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं यावर भाष्य केलं आहे. या अभिनेत्रीनं तर तिच्या पहिल्याच वेब सीरिजमध्ये एकाच वेळी दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला होता, यावेळी तिच्या मनात काय चाललेलं, तिच्यासोबतच्या पुरूष कलाकारांची अवस्था कशी होती? यावर तिनं सगळंच सांगितलं आहे.
मराठमोळी अभिनेत्री तन्वी पाटील बोलताना म्हणाली की, "मी माझ्या पहिल्याच वेबसीरिजमध्ये टॉपलेस सीन दिला होता... दोन पुरुष आणि मी... असा आमच्यातला हा लव्हमेकिंग सीन होता... माझ्या संपूर्ण आर्टिस्ट करिअरमधला तो पहिला लव्हमेकिंग सीन होता... त्यामुळे मुळात पहिल्याच सीनमध्ये थेट लव्हमेकिंग सीन करणं हेच माझ्यासाठी कठीण होतं... एकाच अभिनेत्यासोबत असलं असतं तरी ठीक होतं... पण नशिबानं माझे सहकलाकार खूप चांगले होते... आम्ही आधी एकत्र बसलो, चर्चा केली... मी कशात कम्फर्टेबल आहे, ते कशात कम्फर्टेबल आहेत, हे समजून घेतलं... आम्ही एकमेकांना जाणून घेतलं..."
"फक्त अभिनेत्रींनाच नाहीतर, अभिनेत्यांनाही असे सीन्स करताना अनकम्फर्टेबल वाटतं..."
तन्वी पाटील म्हणाली की, "आपल्या इंडस्ट्रीत खूप मोठा गैरसमज आहे की, असे सीन्स शूट करताना फक्त अभिनेत्रींनाच अनकम्फर्टेबल वाटतं... तर तसं अजिबात नाही. अभिनेत्यांनासुद्धा तितकंच अवघडल्यासारखं वाटतं... मी नेहमी माझ्या को-आर्टिस्टसोबत बसून बोलते आधी... तिथेच त्यांची परवानगी घेते की, असे सीन्स करताना तुम्हाला काय-काय ओके आहे आणि तुम्हाला काय आवडत नाहीये... त्यानंतर ते माझी परवानहगी घेतात की, मला काय-काय नकोय... मगच तुम्ही कम्फर्टेबल होऊ शकता... आणि सीन्स पूर्ण करू शकता. कारण सीनमध्ये सहकलाकार माझ्यासोबत जे करतोय ते मला आवडत नाहीये हे माझ्या चेहऱ्यावर दिसणार, बॉडी लँग्वेजमध्ये दिसणार. यामुळे सीन खराब होणार. शेवटी माझंच काम खराब होणार... लोकं माझ्या सीरिज बघतात. मला वाईट दिसायचं नाहीये. जर तो हॉट सीन आहे, तर तो तसाच दिसला पाहिजे... करायचं म्हणून केलं असं ते नको... ज्याला आम्ही आमच्या इंडस्ट्रीत टेटलेशन म्हणतो..."
"मी या इंडस्ट्रीत गेल्यानंतर काही लोकांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला"
"मी या इंडस्ट्रीत गेल्यानंतर काही लोकांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की, अगं असं नको करूस, असं कशाला करतेयस... तेव्हा मी माझ्या मित्रमंडळींनाही हेच सांगितलं आणि मलाही मी हेच सांगते की, आपण खूप नशीबवान आहोत की, आपल्याला काम मिळतं... आज इंडस्ट्रीत अशा अनेक मुली आहेत, ज्यांना कामंही मिळत नाही... हा मी आधी विचार करते, काहीही झालं तरी मला काम मिळतंय ना आज... निदान मला माझ्या पोटापाण्याचं टेन्शन नाहीय... मी कमावतेय माझी मी... याच टप्प्याव कित्येक मुली अडकतात... कामंच मिळत नाहीय, आम्ही सगळं ट्राय करतोय, पण कामंच मिळत नाहीय... हे मी माझ्या मित्रमैत्रिणींनाही सांगते की, ज्यांना माझ्याशी प्रॉब्लेम आहे, माझ्यापासून लांब राहा, मला चालेल.... पण तसंही असे लोक फ्रेंड्स म्हणण्याच्या लायकीचे नसतात... मी फारच तिखट बोलतेय, पण हेच खरं आहे... मित्रमैत्रिणींनी नेहमीच तुमच्यासाठी चांगला विचार केला पाहिजे... तुम्हाला शंका आली, तर मला मान्य आहे, पण गॉसिप करणं वैगरे वैगरे... त्यांच्यासाठी मी सांगेन, आणखी बोला माझ्याबाबत, मला काही फरक पडत नाही, मला माहीत आहे, मी प्रसिद्ध आहे...", असं तन्वी पाटीलनं सांगितलं.
दरम्यान, अडल्ट वेब सीरिजमध्ये काम करणारी मराठमोळी अभिनेत्री तन्वी पाटील सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिने अनेक वेबसीरिजमध्ये बोल्ड भूमिका केल्या आहेत. ती आपले ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :