Prajakta Mali on Pravin tarde clash: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta mali) चाहतावर्ग खूप मोठा आहे. अलिकडेच अभिनेत्रीने आपला 37 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. केवळ अभिनयच नाही,  तर निर्मीती क्षेत्रातही तिनं पाऊल ठेवलं.  तसेच अभिनेत्रीला बिझनेसमध्येही विशेष रस आहे. प्राजक्ताने 'फुलवंती' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली तसेच तिने या सिनेमाची निर्मीतीही केली. याच सिनेमाच्या निर्मीतीदरम्यान (Phulwanti),  अभिनेत्रीचा प्रवीण तरडेंशी (Pravin Tarde) वाद झाला होता.  अलिकडेच अभिनेत्रीने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने या भांडणाचा उल्लेख करत, नेमकं काय घडलं याची माहिती दिली.  

Continues below advertisement

प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यातील नेमका वाद काय? (Prajakta Mali and Pavin Tarde Disagreement)

प्राजक्ताच्या 'फुलवंती' या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली होती. या सिनेमाच्या महत्त्वाच्या भूमिकेत प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी आहेत.  या सिनेमाचे लेखन प्रवीण तरडे यांनी केलं. तर, दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केलं. या सिनेमाची निर्मीती प्राजक्ता माळी हिनं केलं.  या सिनेमाच्या संबंधित एक किस्सा प्राजक्ता माळीनं मुलाखतीत शेअर केला.  या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, प्राजक्ता आणि प्रवीण यांच्यात टोकाचा वाद झाला होता. लोकमत फिल्मीशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'हो, 'फुलवंती' या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान, आमच्यात मतभेद झाले होते.  पण त्यांनी जे शिकवलं, ते महत्त्वाचं होतं'.

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडेंमध्ये नेमकं कोणत्या विषयावरुन वाद झाला?

'खरंतर जेव्हा एक बाजू दुसऱ्या बाजूला धडकते, तेव्हाच तिसरं काहीतरी निर्माण होतं, ते चांगलं असतं. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा असं नसतं.  एका वेळेस वाटू शकतं की, मी वयाने लहान आहे,  कर्तृत्वाने लहान आहे. मोठ्या पॉझिशनला बसले.  कधी कधी लोकांना सहन होतं, कधी सहन होत नाही.  कधी लोकांमध्ये मत्सर निर्माण होतो.  या सगळ्यातून मला जावं लागलं. मी म्हणेन, शेवटचा रिझल्ट हा महत्त्वाचा असतो'.

Continues below advertisement

'आता त्यांच्यापेक्षा जास्त अभिमान या चित्रपटाविषयी कुणाला वाटत नाही.  इतके ते आपल्या प्रोजेक्टला घेऊन पॅशिनेट असतात. आता मी सरांसोबत एक तास बोलत आले. शो नीट बघ,  तुझे अजून यावर रिल तयार का नाही झाले?  हे गाणं वाजव, असं ते मला म्हणतात. मला असं वाटतं मोस्ट पॅशिनेट सर हे प्रवीण सर आहेत. मला असं वाटतं की मतभेद झालेच पाहिजे. मतभेद झाले नाही तर कळणार कसं? संघर्ष पाहिजे... त्याच्याशिवाय चांगलं काही निर्माण होणार नाही', असं प्राजक्ता माळी म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक