Abhay Patil: अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरूयेत. 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉ. अभय पाटील (Dr Abhay Patil) यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतलीय. दोघांच्या तासभराच्या भेटीत पुढच्या राजकीय निर्णयाबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

Continues below advertisement

2024 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे तब्बल 4 लाख 16 हजार मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉ. पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला होताय. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यात नुकतीच त्यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय. या सर्व पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा'ने डॉ. अभय पाटील यांना बोलतं केलंय.

Abhay Patil on Congress: काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाबद्दल नाराजी

'एबीपी माझा'शी बोलतांना त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं मान्य केलंय. यासोबतच त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वाबद्दल जोरदार नाराजी व्यक्त केली. काँग्रेसकडे निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही कार्यक्रम आणि यंत्रणा नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. यासोबतच काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना भेटणं ही अतिशय कठीण गोष्ट असल्याचं  म्हटलंय. आपला पराभव झाल्यानंतर काँग्रेसने कधीही त्यासंदर्भात विचारणा किंवा आत्मचिंतन केलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय.  

Continues below advertisement

Abhay Patil on Nana Patole: नाना पटोलेंचे कौतुक

पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोणतेही कारण नसताना सपकाळ यांनी आपल्याला पक्षाच्या प्रदेश महासचिव पदावरून काढल्याचं त्यांनी म्हटलंय. आपल्याला महासचिव पदावरून पदोन्नतीची अपेक्षा असताना कोणतेही पद न देत काँग्रेसने आपली अवहेलना केल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, सपकाळ यांच्या आधीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खऱ्या अर्थाने काम करणारे नेते असल्याचं ते म्हणाले. नाना पटोले हा खमके नेता आणि जबाबदारी स्वीकारणारा नेता आहे. नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात अनेक वेळा ते अकोल्यात आले. माझ्या तिकिटासाठी त्यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले, असे अभय पाटील म्हणाले. तसेच, आता मनधरणी करणाऱ्या काँग्रेसने परत लोकसभेची उमेदवारी दिली तरी काँग्रेसचा विचार करणार नसल्याचं अभय पाटील यांनी सांगितलं.

Abhay Patil: 15 ऑगस्टला चित्र स्पष्ट होणार

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा स्वीकारल्यास त्यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचार करू. मात्र या संदर्भातील सर्व निर्णय 15 ऑगस्ट रोजी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेणार असल्याचा त्यांनी स्पष्ट केलंय. एकनाथ शिंदेंनी मला तुम्हाला काय हवं असं विचारलं. परंतु मी स्वतःसाठी न मागता जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्यासमोर माझा अजेंडा ठेवला. मी मांडलेले विकासाचे मुद्दे एकनाथ शिंदे यांनी मान्य केले तर मी निश्चितच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करेल, असे अभय पाटील म्हणाले. आता अभय पाटील नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Who is Abhay Patil: कोण आहेत डॉ. अभय पाटील? 

1) विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ञ.

2) वडील डॉ. के. एस. पाटील विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ञ होते. डॉ. के. एस. पाटील विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते.

3)  आधीच्या कार्यकारिणीत डॉ. अभय पाटील होत् प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस

4) डॉ. पाटील अकोला होते 2024 च्या लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार.

5) मराठा मोर्चाच्या समन्वयकांपैकी एक.

Abhay Patil: 2024 च्या लोकसभेत अकोल्यात उमेदवारांना मिळालेली मते 

अनुप धोत्रे  : भाजप : 457030डॉ. अभय पाटील : काँग्रेस : 416404प्रकाश आंबेडकर : वंचित : 276747

भाजपचे अनुप धोत्रे 40 हजार 626 मतांनी विजयी.

आणखी वाचा 

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil: 'सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की...'; विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका