Prajakta Mali Announces Upcoming Project: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) चाहतावर्ग फार मोठा आहे. प्राजक्ताने मालिकांपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात केली. नंतर तिनं सिनेमांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. प्राजक्ता माळीचा 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्रचंड गाजली. यानंतर 'नकटीच्या लग्नाला यायचं हां', 'फुलवंती', 'खो-खो', 'चंद्रमुखी', अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली. मालिका सिनेमांसह तिचा 'रानबाजार' ही वेबसिरीज देखील प्रंचड गाजली. या सिरीजमधील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. तसेच ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी शोचं देखील सूत्रसंचालन करते. दरम्यान, प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. तिनं आगामी प्रॉजेक्ट्सबाबत चाहत्यांना हिंट दिली आहे.
प्राजक्ता माळीचा चाहतावर्ग मोठा
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती आपल्या दैनंदिन घडामोडींचे प्रेक्षकांना अपडेट्स देत असते. तिनं अलिकडेच सोशल मीडियावर आस्क मी सेशन केलं होतं. प्राजक्ताने चाहत्यांसोबत संवाद साधला. तिनं चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान, चाहत्यांनी तिला विविध प्रश्न विचारले. यादरम्यान, तिनं एका चाहत्यांच्या एका प्रश्नावर उत्तर दिलं. या उत्तरमधून तिनं चाहत्यांना हिंट दिली आहे.
आगामी प्रोजेक्टबाबत माहिती
एका चाहत्याने तिला, "तुला पुन्हा पडद्यावर पाहायला खूप उत्सूक आहे. तुझा आगामी कोणता प्रोजेक्ट येणार आहे का?" असा प्राजक्ताच्या आस्क मी सेशनमध्ये प्रश्न चाहत्याने विचारला. या प्रश्नावर प्राजक्ता माळीनं उत्तर दिलं. तसेच आनंदाची बातमी शेअर केली. प्राजक्ता माळी म्हणाली, "हो.. जानेवारी 2026मध्ये मी तुम्हाला ZEE 5 अॅपवरील वेब सिरीजमध्ये दिसेन... देवखेळ.." प्राजक्ताने चाहत्याला त्याच्या प्रश्नाला उत्तर देत आगामी प्रोजेक्टची देखील घोषणा केली. तिनं दिलेल्या माहितीनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
प्रोफेशनल आयुष्याबाबत अनेक प्रश्न
आस्क मी सेशनमध्ये प्राजक्ताला वैयक्तिक तसेच प्रोफेशनल आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. आस्क मी सेशनमध्ये तिला चाहत्याने 'बिग बॉसमध्ये दिसणार का?' असा प्रश्न विचारला होता. यावर तिने 'कधीच नाही', असं उत्तर दिलं. सेशनमध्ये, 'लग्न कधी करणार?', 'तुझा नेमका क्रश कोणता?', असे अनेक प्रश्न विचारले जातात. दरम्यान, आस्क मी सेशनद्वारे तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली. सध्या प्रेक्षकवर्ग प्राजक्ता माळीच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.