Prajakta Mali Mahashivratri Program : महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्रंबकेश्वरमधील (Trimbakeshwar) मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भरतनाट्य नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरा ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी हा आक्षेप नोंदवलाय. त्यानंतर आता प्राजक्ता माळी हिच्या नृत्याविष्काराच्या कार्यक्रमावर गंडांतर येण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाच आता प्राजक्ता माळी हिने एका व्हिडीओच्या माध्यमातून या कार्यक्रमाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी एक भरतनाट्यम नृत्यांगणा आहे, त्यामुळे मी देवाची सेवा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करत आहे, असं तिनं म्हटलंय. 

नेमका आक्षेप काय आहे? 

 प्राजक्ता माळी त्रंबकेश्वराच्या ज्योर्तिलिंग मंदिराच्या परिसरात 'शिवस्तुती नृत्याविष्कार' नावाने भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहे. तिच्या याच सांस्कृतीक कार्यक्रमावर भारतीय पुरातत्त्व विभागाने आक्षेप घेतलाय. हा कार्यक्रम घ्यायचा असेल तर दिल्लीच्या कार्यालयातून परवानगी घ्यावी, अशी भूमिका घेतली आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर समितीच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनीदेखील या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमास गर्दी होऊ शकते त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच सेलिब्रिटी इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही. चुकीचा पायंडा पाडू नये. सोबतच मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, अशी भूमिका ललिता शिंदे यांनी घेतली आहे. 

प्राजक्ता माळीने नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?

या सर्व आक्षेपानंतर आता प्राजक्ता माळी हिने या नृत्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. देवाच्या दारी कोणीही सेलिब्रिटी नसतो. देवाजवळ प्रत्येक जण भक्त असतो. गर्दीचा प्रश्न निर्माण झाल्यावर देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल. सोबतच मी या कार्यक्रमात फक्त दोनच रचना सादर करणार आहे. बाकी उर्वरित कार्यक्रमात मी निवेदन करणार आहे, असं प्राजक्ता माळीने सांगितलंय. सोबतच मी एक भरतनाट्यम नृत्यांगणा आहे. मी त्याचे शिक्षण घेतलेलं आहे. माझ्याकडे याची पदवीही आहे, असंही प्राजक्ता माळीने म्हटलंय. 

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या या स्पष्टीकरणानंतर आता मंदिर देवस्थान समिती काय भूमिका घेणार? तसेच तिला होत असलेला विरोध थांबणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

Nashik Prajakta Mali Mahashivratra Program: त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र

मोठा महल, आलिशान जीवन, महाराणी गायत्री देवी यांचा राजेशाही थाट रुपेरी पडद्यावर दिसणार, लवकरच नवी वेबसिरीज येणार!

Vaidehi Parshurami: वैदेही परशुरामीच्या घायाळ करणाऱ्या अदा; पाहा इंडो वेस्टर्न साडी लूक!