Prajakta Koli Video: अभिनेत्री (Actress) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Influencer) प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) म्हणजे, चाहत्यांची लाडकी मोस्टली सेन (Mostly Sane). आपल्या क्लासी अंदाजानं प्राजक्ता नेहमीच चाहत्यांना वेड लावते. प्राजक्तानं नुकतीच आपला लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड (long Time Boyfriend) वृषांक खनालसोबत (Vrishank Khanal) आपली लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दीड महिन्यानंतर प्राजक्तानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून चाहते पुरते हैराण झाले आहेत. प्राजक्तानं शेअर केलेल्या व्हिडीओत ती प्रचंड दुःखी असल्याचं पाहायला मिळत आहे. प्राजक्ता आपल्या पतीवर नाराज असल्याचंही या व्हिडीओत दिसतंय. प्राजक्ताचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून तिचा व्हिडीओ पाहून चाहते पुरते हादरुन गेले आहेत. 

तुम्हीही प्राजक्ताचा व्हिडीओ पाहून हादरुन गेला असाल, तर अजिबात घाबरु नका. तुम्ही मोस्टली सेनला फॉलो करत असाल तर तुम्हाला तिचा गंमतीशीर अंदाज ठाऊक असेलच. लग्नानंतर दुःखी असल्याचा जो व्हिडीओ प्राजक्तानं शेअर केला आहे. तोसुद्धा गंमतीशीर व्हिडीओ आहे. ज्यामध्ये तिनं एक क्लासी कॅप्शन दिलं आहे. ती बाटलीतून वाईन पिताना दिसत आहे. तिच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.  

प्राजक्ताचा व्हिडीओ व्हायरल झाला

प्राजक्तानं व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय की, जेव्हा आणि क्लासी सनसेटच्या फोटोंसाठी लग्न करतो आणि आता तुम्हाला एका मुलासोबत राहावं लागतंय. व्हिडीओमध्ये, सर्वात आधी प्राजक्ता ग्लासमध्ये वाईनचे दोन घोट ओतते आणि ते ग्लास तिचा नवरा वृषांकला देते आणि नंतर हातातली वाईनची बाटली ती थेट तोंडाला लावते आणि घटाघटा वाईन प्यायला सुरुवात करते. हा व्हिडीओ शेअर करताना तिनं थू थू थू आणि वाईट नजरेचे इमोजी पोस्ट केले आहेत.

चाहत्यांकडून गंमतीशीर कमेंट्सचा पाऊस 

प्राजक्ताचा व्हिडीओ पाहून चाहते स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. एका युजरनं लिहिलंय की, मी गेल्या 16 वर्षांपासून असं जीवन जगतेय... आणखी एका युजरनं लिहिलंय की, अरे देवा.. तर एका युजरनं वृषांकला चक्क गरीब माणूस म्हणून संबोधलं आहे. तसेच, याला काय सुरू आहे, याची कल्पनाच नसल्याचंही म्हटलं आहे. 

प्राजक्ता आणि वृषांक यांचं लग्न या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्नात मराठी आणि नेपाळी दोन्ही रितीरिवाजांचे पालन करण्यात आले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. वृषांक फिल्मी बॅकग्राउंडचा नाही. पण तो नेहमीच प्राजक्तासोबत दिसतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Navjot Singh Sidhu's daughter in law Inayat Photos: वाह गुरु हीरा तराशा है... नवज्योत सिंह सिद्धू यांची सुनबाई जणू शुक्राचीच चांदणी, दिग्गज अभिनेत्रीही हिच्यापुढे ठरतात फेल; सौंदर्य तर तौबा तौबा!