Navjot Singh Sidhu's daughter in law Inayat Photos: भारताचे माजी क्रिकेटपटू (Former Indian Cricketer) नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. फक्त ठोको ताली... म्हटलं तरीसुद्धा क्षणातच सर्वांसमोर सिद्धू उभे राहतात. आपल्या उत्कृष्ट खेळीसोबतच सिद्धू आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी विशेष चर्चेत असतात. तसेच, त्यांच्या कविता आणि वन-लायनरची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगते. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सिद्धू कॉमेंट्री करताना पाहायला मिळतात. पण, केवळ प्रोफेशनल लाईफच नाहीतर, आपल्या पर्सनल लाईफमुळेही सिद्धू चर्चेत असतात. पण, सध्या ते चर्चेत आहे, त्यांच्या सुनबाईमुळे. सिद्धू यांच्या सुनबाईची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.
नवज्योत सिंह सिद्धू यांची सुनबाई जणू शुक्राची चांदणी
दोन वर्षांपूर्वी नवज्योत सिंह सिद्धू यांचा मुलगा करण याचं लग्न झालं होतं. त्यांचा मुलगा करण आणि सून इनायत यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतच्या फोटोंवर चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केला होता. कारण करण आणि इनायत (Inayat Randhawa Sidhu) यांची जोडी खरोखरच अगदी लक्ष्मी-नारायणासारखी दिसत होती. नवज्योत सिंह सिद्धू यांची सून इनायत खूपच सुंदर आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला मागे टाकू शकते. इनायतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे पाहून लोक तिचं कौतुक करताना थकत नाहीत. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री करिना कपूर, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, दीपिका पादुकोण साऱ्या हिच्या सौंदर्यापुढे फेल ठरतायत.
सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे, इनायत
नवज्योत सिंह सिद्धू यांची सुनबाई इनायत रंधावा मूळची पटियालाची आहे. ती संरक्षण सेवा कल्याण विभागाचे उपसंचालक (Deputy Director, Defense Services Welfare Department) मनिंदर रंधावा यांची मुलगी आहे. वडिलांच्या कामाच्या स्वरुपामुळे त्यांची अनेकदा बदली व्हायची. त्यामुळे इनायतचं शिक्षण देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि शाळांमध्ये झालं. आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं कला शाखेची पदवी घेतली. नवज्योत सिंह सिद्धू यांची सुनबाई इनायत देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे 11 हजारांहून अधिक चाहते आहेत. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नेटकरीही इनायतच्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :