Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Wedding Entry Controversy: मराठी मनोरंजनविश्वात सध्या लगीनघाई सुरूये. अशातच 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिनंही शंभूराज खुटवड (Shambhuraj Khutwad) याच्याशी आपली लग्नगाठ बांधली. प्राजक्ताचं लग्न ठरल्यापासूनच तिच्या आणि शंभूराजच्या लगीनघाईची चर्चा रंगलेली. अगदी डोळे दिपवणाऱ्या, शाही विवाहसोहळ्यात प्राजक्ता गायकवाडनं उद्योगपती शंभूराज खुटवडशी साताजन्माची गाठ बांधली. प्राजक्ताच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच आता दोघांच्या रिसेप्शनची तुफान चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

प्राजक्ताच्या रिसेप्शनच्या लूकपेक्षाही तिची एन्ट्री चर्चेचा विषय ठरतेय. पुण्यात पार पडलेल्या पारंपरिक, शाही विवाहसोहळ्यात प्राजक्ता आणि शंभूराजनं रिसेप्शनसाठी दणक्यात एन्ट्री घेतली. दोघांची एन्ट्री डोळ्यांचं पारणं फेडणारी भव्य अशी होती. एका भव्यदिव्य अशा नंदीवर बसून प्राजक्ता गायकवाडनं दणक्यात एन्ट्री घेतली. 

प्राजक्ता आणि शंभूराजची ग्रँड एन्ट्री (Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Grand Entry)

प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील ग्रँड एन्ट्रीवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या. नवविवाहित दाम्पत्याची ही अति ग्रँड एन्ट्री पाहून उपस्थितांसह नेटकरीही थक्क झाले. दोघांनी एका अवाढव्य अशा नंदीवर बसून रिसेप्शनच्या ठिकाणी ग्रँड एन्ट्री घेतली. मराठमोळ्या परंपरेचा हा शाही थाटबाट लक्ष वेधणारा ठरला. प्राजक्ता, शंभूराजची नंदीवरुन एन्ट्री होत असताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पण, सर्व अगदी थाटामाटात, धुमधडाक्यात सुरू असताना उपस्थितांना जे खटकलं नाही, ते नेटकऱ्यांनी हेरलं आणि प्राजक्ता गायकवाडला फैलावर धरलं. 

Continues below advertisement

अवाढव्य नंदीवरच्या भव्यदिव्य एन्ट्रीमुळे प्राजक्ता गायकवाड टीकेची धनी (Prajakta Gaikwad Trolled Over Reception Grand Entry)

 उद्योगपती शंभुराज खुटवड आणि प्राजक्ता गायकवाडनं अतिभव्य एन्ट्री घेतली आणि त्यामुळेच आता ती नेटकऱ्यांच्या टीकेची धनी ठरतेय. प्राजक्ता शंभूराजनं अवाढव्य नंदीवर बसून एन्ट्री घेतली. पण, ज्या नंदीवर प्राजक्ता आणि शंभुराज बसलेले, त्या भव्य नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत होते. ते पाहून चाहत्यांचा काहीसा हिरमोड झाला आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, अनेक चाहत्यांनी भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.  

प्राजक्ताच्या ग्रँड एन्ट्रीवरुन धार्मिक भावना दुखावल्याचा सूर (Prajakta Gaikwad Wedding)

प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील ग्रँड एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला कौतुकाच्या कमेंट्स नंतर टीकात्मक झाल्या. त्याला कारण ठरले, एन्ट्रीमध्ये चालणारे भगवान शंकर पाहून चाहते चिडले. एका युजरनं कमेंट करत लिहिलंय की, "हे फार चुकीचं आहे आपल्याच देवांची मस्करी आहे ही आणि असं स्वतःला श्रेष्ठ ठरवलंय, काय बोलायचं...", आणखी एका युजरनं म्हटलंय की, "काय प्रकार आहे हा?", तर एका युजरचं म्हणणं आहे की, "हल्ली प्रत्येक गोष्टीचा शो-ऑफ करावा लागतो... लग्न हे स्वतःसाठी करतात की समाजासाठी.. हेच समजत नाही", तर एकानं "एक मालिका हिट झाली की कलाकारांना एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो...", असा टोला लगावला आहे. 

दरम्यान, प्राजक्ता गायकवाड ही मराठी मनोरंजन विश्वातील एक ओळखीचा चेहरा आहे. तिनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. शंभूराज खुटवड हा एक यशस्वी उद्योगपती आणि पैलवान म्हणून ओळखला जातो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

गायकवाडांची लेक झाली खुटवडांची सून; थाटामाटात, धुमधडाक्यात पार पडला प्राजक्ता-शंभुराजचा राजेशाही विवाहसोहळा, PHOTOs