Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: बॉलिवूड (Bollywood News) आणि टॉलिवूडमधील (Tollywood News) दमदार अभिनेते प्रदीप रावत (Actor Pradeep Rawat) यांचं 4 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. बऱ्याच काळापासून ते प्रकृतीच्या व्याधींनी त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील (Mumbai News) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत रावत यांनी खलनायक आणि सहाय्यक भूमिकांच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.  आमिर खानच्या 'गजनी' (Ghajini) सिनेमातील भीतीदायक खलनायक आणि 'लगान'मधील (Lagaan) 'देवा सिंह सोधी' ही त्यांनी साकारलेली पात्रं प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. त्यांच्या निधनामुळे हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीनं (Tollywood) एक अनुभवी कलाकार गमावलाय.

Continues below advertisement

प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत (Tollywood Actor Pradeep Rawat) यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालंय. अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर करताना लिहिलंय की, "प्रदीप रावत, आपले 'गजनी' आणि 'लगान'मधील 'देवा', आता आपल्यात नाहीत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..." त्यांनी या पोस्टमध्ये दुःखी असल्याचे इमोजीही जोडले आहेत.

टेलिव्हिजनवरून सुरुवात; 'महाभारत'मुळे मिळाली पहिली ओळख (Actor Pradeep Rawat Struggle)

Continues below advertisement

21 जानेवारी 1952 रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जन्मलेले प्रदीप रावत (Bollywood Actor Pradeep Rawat) यांनी सिनेमांकडे वळण्यापूर्वी टेलिव्हिजनवरून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बी.आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय 'महाभारत' या मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारून त्यांना पहिली मोठी ओळख मिळाली. त्यानंतर, 1985 मधील 'मेरी जंग' सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध सिनेमांमध्ये लहान पण प्रभावी भूमिका साकारल्या आणि हळूहळू सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान पक्कं केलं.

'सरफरोश', 'लगान' आणि 'गजनी'मुळे बनले एक सुपरस्टार व्हिलन (Pradeep Rawat Struggle Stroy)

प्रदीप रावत यांना 'सरफरोश' (1999), 'लगान' (2001) आणि 'गजनी' (2005 तमिळ, 2008 हिंदी) यांसारख्या सिनेमांमुळे खरी लोकप्रियता मिळाली. 'लगान'मध्ये त्यांनी देवा सिंह सोधीची भूमिका साकारली, तर 'गजनी'मधील त्यांच्या भूमिकेनं त्यांना देशभर प्रसिद्धी मिळवून दिली. विशेष म्हणजे, मूळ तमिळ सिनेमा आणि त्याचा हिंदी रिमेक या दोन्हीमध्ये त्यांनी तीच भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त, ते 'द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'ग्रँड मस्ती', 'सिंग इज ब्लिंग' आणि 'छावा' यांसारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये झळकले. तसेच, त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेसृष्टीतही दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द घडवली.

साऊथ सिनेसृष्टीतही उमटवली अमिट छाप

प्रदीप रावत यांचं कार्य केवळ हिंदी सिनेमांपुरतंच मर्यादित नव्हतं. त्यांनी 'स्ये' (Sye) या तेलुगू सिनेमाद्वारे दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केलं आणि आपल्या अभिनयासाठी 'सर्वोत्कृष्ट खलनायक' (तेलुगू) हा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. त्यांना 'नंदी' आणि 'संतोषम' यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कारही मिळालेत. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमधील 100 हून अधिक सिनेमे आणि टेलिव्हिजनवरच्या मालिकांमध्ये काम केलं. आपला दमदार आवाज, पडद्यावरील प्रभावी उपस्थिती आणि खलनायकाच्या भूमिका साकारण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली यामुळे प्रदीप रावत यांची गणना नेहमीच भारतीय सिनेसृष्टीतील अविस्मरणीय कलाकारांमध्ये केली जाईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास