Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: सिनेसृष्टी जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढी ती खरोखरच आहे का? हा प्रश्न कायम चर्चेत असतो. अनेकजण सिनेसृष्टी मग बॉलिवूड (Bollywood) किंवा मराठी इंडस्ट्री (Marathi Industry) एक मायाजाल असल्याचंही सांगतात. यापूर्वी आणि आजही अनेक अभिनेत्री त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत उघडपणे बोलतात. तर, अनेकजणींना को-स्टार किंवा दिग्दर्शकाकडून मिळालेल्या घाणेरड्या वागणुकीचा बळी पडल्याचंही सांगतात. असाच अनुभव मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीच्या वाट्याला आला आहे.
झी मराठीवरची (Zee Marathi) 'तू चालं पुढे' मालिका प्रचंड गाजली. मालिकेत अनेक कलाकार झळकले, पण त्यांपैकी ताराची भूमिका साकारणारी प्राची पिसाटही साऱ्यांच्या लक्षात राहिली. प्राची सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पण, नुकताच प्राचीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलीय. जी चर्चेचा विषय ठरतेय. प्राची पिसाटनं प्रसिद्ध सिने अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला केलेल्या फेसबुक मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉर्ट शेअर करत प्राचीनं अनेक गंभीर आरोप केले आहेत.
प्राचीनं आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत म्हटलं आहे की, 'आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली... बायकोचा नंबर असलेच... ती ही गोड आहे... बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का... ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरीनंबर मिळवशील आणि कॉल करशीलच' तसेच, प्राचीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते...'
सुदेश म्हशीलकर यांनी प्राचीला नेमका काय मेसेज केलाय?
सुदेश म्हशीलकर हे मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणले जातात. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेमधून झळकत आहेत. आता प्राची पिसाटनं सुदेश यांच्या फेसबुक मेसेजचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्क्रीन शॉटमध्ये असं दिसून येतंय की, 'तुझा नंबर पाठव ना... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये... कसली गोड दिसतेस' असा मेसेज सुदेश यांनी प्राचीला केला आहे.
सुदेश यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालंय?
सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट प्राची पिसाटनं शेअर केल्यानंतर युजर्सनी प्राचीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित सुदेश म्हशीलकर यांचं अकाउंट हॅक झालं असेल, असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. तसेच, एका युजरनं म्हटलंय की, "काही लोकं यांना खूप वर्षांपासून ओळखतात आणि एवढी 100 टक्के खात्री ही आहे की, हे नसतील, तू पोलिसांत तक्रार दाखल कर, ते सांगतील हॅकर होता की ते स्वतः आहेत." युजरच्या कमेंटवर प्राचीनंही रिप्लाय केलाय की, "मला कुणालाच त्रास द्यायचा नाही... मला फक्त दोनदा शांतपणे इग्नोर केल्यानंतर एका मॅच्युअर माणसाला कळलं नाही म्हणून माझ्या पद्धतीने मेसेज येणं बंद करायचं होतं."
प्राची पिसाटच्या पोस्टवर कमेंट करत अभिनेते राजेश देशपांडे यांनी सुदेश म्हशीलकर यांची बाजू घेतली आहे. राजेश देशपांडे म्हणाले की, "हे सुदेशनं केलेलं नाहीये... तो फेसबुकवर अनेक दिवस लॉग इन नाहीये... आणि तो असा माणूस नाहीये... काहीतरी गफलत आहे." यावरही प्राचीनं रिप्लाय करत लिहिलंय की, "त्यानेच मेसेज केलाय असं त्यांनी अनेकांना सांगितलंय." पुढे प्राचीनं लिहिलंय की, "हो असू शकतं... बाय द वे हॅकर मराठी होता... आणि अनेक महिने मुलींना मेसेज करत असेल... बरं झालं... माझ्या निमित्तानं कळलं तरी असे मेसेज करतोय... आणि हो... हुशार पण होता... लगेच अनफ्रेंड केलं हॅकरने..." असं म्हणत प्राचीनं आणखी एका मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. त्यामध्ये सुदेश म्हशीलकर यांनी लिहिलंय की, "खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली...वा"
महत्त्वाच्या इतर बातम्या :