Poonam Pandey Seeks Blessings From Premanand Ji Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि मॉडेल पूनम पांडे (Model Poonam Pandey) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. पण, सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या बिनधास्त स्टेटमेंट्सनी सर्वांना आश्चर्यचकीत करणारी पूनम पांडे (Poonam Pandey) अचानक एका व्हायरल व्हिडीओमध्ये देवा-धर्माचं करताना दिसली. पूनम पांडेनं अलिकडेच वृंदावनला (Vrindavan) भेट दिलेली. तिथे पूनम पांडेचा वेगळाच अंदाज सर्वांना पाहायला मिळालाय. पूनमचा हा अंदाज पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरच्या व्हायरल कमेंटमध्ये पूनम पांडे प्रेमानंद महाराजांच्या (Premananda Maharaj) आश्रमात प्रवचन ऐकताना दिसतेय. बरं एवढंच नाहीतर, प्रेमानंद महाराजांचं प्रवचन ऐकून पूनम पांडेला अश्रुही अनावर झाल्याचं व्हिडीओत दिसतंय.

पूनम पांडे आणि वाद हे जणू समीकरणच आहे. अनेकदा आपल्या वक्तव्यानं पूनम पांडेनं स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतलीय. दोन वर्षांपूर्वी पूनम पांडेच्या मृत्यूच्या अफवांनीही जोर धरलेला. पण, त्यानंतर हा तिचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं समोर आलेलं. पूनम पांडेनं स्वतःच स्वतःच्या मृत्यूबद्दल अफवा पसरवल्यामुळे ती नेटकऱ्यांच्या टीकेची धनी झालेली. चोहीकडून तिच्यावर सडकून टीका करण्यात आलेली. एवढंच काय तर तिनं अलिकडेच तिला एक क्रिकेटपटू मेसेज करत असल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यानं तिला भेटायलाही बोलावलेलं पण, तिनं नंतर त्याला ब्लॉक केलं, असा दावाही तिनं केलेला. अशातच आता अतरंगी पूनम पांडे भक्तीचा मार्ग धरल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहींनी तिचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

पूनम पांडेच्या भक्तीमय अंदाजावर युजर्सच्या भन्नाट कमेंट्स 

एका युजरनं लिहिलंय की, "ही तीच व्यक्ती नाही का जी मेल्यानंतरही पुन्हा जिवंत झाली? देव एक अद्भुत कलाकार आहे..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "एका विशिष्ट टप्प्यानंतर, देवाच्या चरणीच शांती मिळते..." तर एका युजरनं कमेंट केलीय की, "जर तुम्ही चांगले जीवन सुरू केले असेल, तर पुन्हा कधीही चुकीच्या मार्गानं जाऊ नका..." पुढे एका युजरनं म्हटलंय की, "सर्वांना बिघडवलं आणि आता स्वतः सुधारलीय..." तर एका युजरनं लिहिलंय की, "करून सवरून भागले अन् देवपुजेला लागले..." तर, युजरनं कमेंट केलीय की, "100 चूहे खाकर बिल्ली हज को चली..."

'लोकमत टाईम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार, प्रेमानंद महाराजांच्या प्रवचनानंतर पूनम पांडेचा प्रश्नही निवडण्यात आलेला. पण, प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडल्यानंतर पूनम पांडेला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलं नाही. पूनम पांडे म्हणाली की, ती नेहमीच तिच्या आईसोबत प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात सहभागी होत आली आहे. त्यांच्या शिकवणी ऐकल्यानं त्यांच्या घरात शांती नांदतेय. वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांना भेटणं खरोखरंच एका दिव्य अनुभवात प्रवेश करण्यासारखं होतं, असंही पूनम पांडे म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prasikaofficial Instagram Account Now Active: इन्फ्लुएंसर कपल 'प्रसिका'ला दिलासा; सस्पेंड झालेल्या चार अकाउंट्सपैकी एक अकाउंट सुरू; इंस्टाग्रामनं माफीही मागितली