Poonam Pandey Death : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे आज (दि.2) सकाळी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून पूनम सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) या आजाराशी झुंज देत होती. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे निधन झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पूनमची मॅनेजर निकिता शर्मा (Nikita Sharma) हिने निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 


डिझायनर रोहित वर्मा काय म्हणाला?


दोन दिवसांपूर्वी मी पूनम पांडेसोबत शूटींग केले होते. मला पूनम गेलीये असे अजूनही वाटत नाहिये, असे डिझायनर रोहित वर्मा म्हणालाय. रोहित वर्मा 'एबीपी न्यूज'शी बोलताना म्हणाला, शूटिंगवेळी पूनम पांडे अतिशय तंदरुस्त होती. त्यावेळी तिला कर्करोग झालाय, असे देखील वाटत नव्हते. मला देखील तिच्या टीमकडून निधनाची माहिती मिळाली आहे. पूनम तिच्या कानपूर येथील घरी गेली होती. तिथेच तिचे निधन झाले आहे. अभिनेत्री पूनम पांडे ही मूळची दिल्लीची राहिवासी होती. अतिशय साधारण कुटुंबातून तिने बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात केली होती. पूनम पांडे तिच्या अजब दाव्यांमुळे, वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असायची. नशा या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'द जर्नी ऑफ कर्मा'  आणि 'मालिनी अँड कंपनी', 'दिल बोले हडिप्पा' या सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 


लग्नाच्या 12 दिवसांनंतर पूनम पांडेने केले होते पतीवर आरोप 


पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी 2020 मध्ये विवाह उरकला होता. दरम्यान लग्नाच्या 12 दिवसांनंतरच पूनमने पती सॅमवर गंभीर आरोप केले होते. सॅम बॉम्बेने मारहाण केली असल्याचा आरोप तिने केला होता. त्यानंतर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. सॅम आणि पूनम यांनी वेगळे होण्याचा निर्णय देखील घेतला होता. 


पती सॅम बॉम्बेला गोवा पोलिसांनी केली होती अटक 


"लॉक अप" या शो दरम्यान पूनमने मोठे खुलासे केले होते. पती सॅम बॉम्बे मला नेहमी कंट्रोलमध्ये ठेवायचा. फोन पासून कोणते कपडे घालणार? याबाबतचे निर्णय सॅम घेत होता. पूनम सॅमच्या वागण्याला वैतागली होती. शिवाय, सॅम मला सातत्याने मारहाण करतो, असा आरोपही पूनमने केला होता. पूनमला घरगुती हिंसाचारामुळे ब्रेन हॅमरेजलाही सामोरे जावे लागले होते. दरम्यान, याप्रकरणी सॅम बॉम्बेला गोवा पोलिसांनी अटक देखील केली होती. 










इतर महत्वाच्या बातम्या 


Poonam Pandey : क्रिकेटच्या मैदानात कपडे काढण्याची घोषणा, पार्टीत नशेत बुडाली, पूनम पांडेचे 10 कारनामे, ज्यामुळे नेहमी चर्चेत राहिली!