Mirza Rafi Ahmed Baig Passes Away: महाराष्ट्राच्या कविविश्वात विनोदी काव्यसादरीकरणाची वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज (शुक्रवार, 28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि अमरावतीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज – माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव. सध्या ते अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात 'मिर्झा एक्सप्रेस' नावाच्या घरात वास्तव्यास होते.त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, आणि दोन सुसंस्कृत कन्या महाजबी व हुमा असा परिवार आहे. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात दुपारी दोननंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Mirza Rafi Ahmed Baig Passes Away: साहित्य क्षेत्रातील तेजस्वी, हसरे व्यक्तिमत्व

डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भ-मराठवाडा परिसरात कविसंमेलनांचे आकर्षणबिंदू होते. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभरात अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी 6 हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली. त्यांच्या नावावर 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले होते. त्यांच्या सादरीकरणाची खुमासदार भाषा, तुफानी विनोद, ग्रामीण बोलीतील पोट धरून हसवणारे किस्से, आणि सामाजिक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करणारी शैली त्यांची खास ओळख होती.

Continues below advertisement

Mirza Rafi Ahmed Baig Passes Away: कविता लेखनाची सुरुवात 11 व्या वर्षीच

डॉ. मिर्झा यांचा जन्म 17 सप्टेंबर 1957 रोजी झाला. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी कविता लेखनाची सुरुवात केली, तर 1970 पासून ते मंचावर काव्य सादरीकरण करू लागले. पुढील 50 वर्षे ते विदर्भ व मराठवाड्यातील कविसंमेलनांचे तेज बनून राहिले. शेती, माती, ग्रामीण भाग, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विसंगती, सामाजिक समस्यांवरील हलक्या-फुलक्या, पण अचूक अशा नर्म विनोदी शैलीतील लेखन त्यांच्या लोकप्रियतेचे गमक ठरले. मराठी, वन्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या कार्यक्रमांनी वन्हाडी भाषेची महती देशभर झाली. मोठा माणूस, सातवा महिना, उठ आता गणपत, जांगडबुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या. जांगडबुत्ता या शब्दाचे ते जनक आहेत.

आणखी वाचा 

Gauri Garje Palve Death Case : डॉक्टर गौरी गर्जे प्रकरणात ट्विस्ट, अनंतच्या शरीरावर आढळल्या जखमा, घटनेआधी झालेल्या संवादांचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे, मोठी माहिती समोर