Piyush Mishra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार पीयूष मिश्रा (Piyush mishra) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. अभिनयासोबतच पीयूष हे गीतकार देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून पीयूष हे बॉलिवूडमधून गायब झाले आहेत. 2017 मध्ये दिग्दर्शक दक्षिण बजरंगे यांच्या ‘समीर (Sameer)’ चित्रपटामधील गाणं त्यांनी लिहिलं. त्यानंतर ते बॉलिवूडपासून दूर गेले. एका मुलाखतीमध्ये पीयूष यांनी बॉलिवूडपासून दूर राहण्याचे कारण सांगितले. 


पीयूष मिश्रा यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं, 'बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करताना मी खूप विचार करतो. मी सध्या चांगले पैसे कमावत आहे, खूप आनंदी आहे आणि कुटुंब आणि मित्रांसोबत सेटल आहे. आजकाल मी फक्त तेच करत आहे जे मला करायचे आहे. थिएटर आणि बँड ही माझी आवड आहे.' पुढे पीयूष म्हणाले, 'मला सिनेमाचा कंटाळा आला आहे, असे नाही. सिनेमा हा फक्त माझा व्यवसाय आहे आणि पैसे कमावण्याचा मार्ग आहे, आवड नाही'


'मी ज्या प्रकारची गाणी लिहितो ती चित्रपटात वापरली जाऊ शकत नाहीत. कारण निर्माते खूप विचित्र असतात आणि त्यांना ज्या प्रकारची आयटम साँग पाहिजे असतात ते मी लिहू शकत नाही.' असंही पीयूष यांनी सांगितलं. पीयूष यांनी पुढे सांगितले की, 'निर्माते माझ्या गाण्यांना विचित्र म्हणतात, म्हणून मी माझ्या स्वतःच्या बँडमध्ये मी लिहिलेली गाणी वापरतो. त्याचबरोबर मी ज्या प्रकारची गाणी लिहितो, ती अनुराग कश्यपशिवाय दुसरा कोणी दिग्दर्शक वापरू शकत नाही.'


दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटामध्ये पीयूष यांनी प्रमूख भूमिका साकारली. पींक, संजू. हॅप्पी भाग जायेगी या चित्रपटांमध्ये पीयूष यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. सॉल्ट सिटी, बारत एक खोज या मालिकांमध्ये देखील पीयूष यांनी काम केले आहे. 


हेही वाचा :



 



  • दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
    यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी  MH10.ABPMajha.Com  या लिंकवर क्लिक करा.