Pinga Ga Pori Pinga Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) पिंगा गं पोरी पिंगा (Pinga Ga Pori Pinga) मध्ये बऱ्याच धक्कादायक घटना एकामागोमाग घडताना दिसत आहेत. मिठूवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता संशयाची सुई सगळ्या पिंगा गर्ल्सवर आली आहे, त्यात काही. हा गुंत्यात सगळ्या अडकणार हे जरी खरं असलं तरीदेखील बुलबुल बागमध्ये सध्या एकच प्रश्न गाजतोय - 'अनिमेश' खरंच आहे की, हा फक्त श्वेताच्या मनाचा खेळ? मिठू प्रकरणानं घेतलेलं हे नवं वळण आता साऱ्या रहस्याच्या मुळाशी जाऊ पाहतंय. श्वेताच्या वडिलांनी केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर पिंगा गर्ल्सच्या पायाखालची जमीन सरकते. पुढे काय होणार मालिकेत? श्वेता कशी आणि कधी सुटणार? पिंगा गर्ल्सना कोणकोणत्या प्रश्नांना समोर जावं लागणार? हे येत्या काही भागांत पाहायला मिळणार आहे.
बुलबुल बागमध्ये घडलेल्या मिठू प्रकरणात जेव्हा सर्वजण एका उत्तराच्या शोधात होते, तेव्हा प्रकरणात अटक झालेल्या श्वेताच्या वडिलांनी केलेला धक्कादायक खुलासा सगळ्यांनाच हादरवून गेला. त्यांच्या मते, श्वेताला पूर्वीपासूनच भास होण्याचा त्रास आहे आणि तिच्या आयुष्यात 'अनिमेश' नावाचा कोणी व्यक्ती खरंच अस्तित्वात असण्याची शक्यता नाही, असं त्यांनी सांगितले आहे. मग कोण आहे अनिमेश? श्वेताचा हा भास आहे का? याचा उलगडा येत्या काही भागांत होणार आहे.
अनिमेश - फक्त एक भ्रम?
वल्लरीचा संपूर्ण विश्वास आहे श्वेतावर. पण जेव्हा तिचेच वडील सांगतात अनिमेश नावाचा कोणच नाही. आणि तेव्हा वल्लरीच्या समोर पेच निर्माण होतो की , वडिलांचं ऐकणार की श्वेतावर विश्वास ठेवणार? तसेच, वल्लरी कसं शोधून काढणार खरा अनिमेश कोण? खरंच अनिमेश आहे का? अनिमेश भ्रम आहे की सत्य? असं काय श्वेता सांगते, ज्यामुळे पोलीस तपासात गोंधळ निर्माण होतो. पोलीस श्वेताचा फोन तपासायचा निर्णय घेतात आणि फोन हॅक करून त्यामधील पुरावे शोधण्याचं काम सुरू होतं.
समीर आणि मिठू - वादातून वाढलेला संशय
दरम्यान, CCTV फुटेजमध्ये मिठू आणि समीर यांच्यात वाद झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याने, समीरलाही तपासात ओढण्यात आले आहे. समीर त्यांची बाजू मांडतो, मात्र चौकशीचा फास टाईट होत चाललेला आहे.
वल्लरीवर दुहेरी दबाव - मित्रत्त्व आणि न्याय यामध्ये संघर्ष
मीरा वल्लरीला स्पष्ट सांगते की तिलाही चौकशीला सामोरं जावं लागेल. रिपोर्टर्सनी बुलबुल बागवर ताबा मिळवताच, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडते. प्रेरणा आणि वल्लरीच्या घरी अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते. सगळ्या मुली या संशयाच्या सावटामुळे मानसिक त्रासात आहेत.
वल्लरी एकीकडे श्वेताला समजून घेण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे मिठूच्या सत्यासाठी झगडत आहे. तिच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो - श्वेताचं सत्य शोधायचं की मिठूचं न्याय मिळवायचं? पुढे काय? सर्व उत्तरं लवकरच उलगडणार आहेत. पण तोपर्यंत एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळतोय, 'कोण आहे अनिमेश?'.
महत्त्वाच्या इतर बातम्या :