Chhaava OTT Release: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवणारा 'छावा' सध्या भल्या भल्या दिग्गजांसमोर पुरून उरला आहे. आतापर्यंत रिलीज झालेला कोणताही बॉलिवूडपट 'छावा'ला (Chhaava Movie) मागे टाकू शकला नाही. सर्वांना सलमान खानच्या (Salman Khna) सिकंदर (Sikandar Movie) चित्रपटाकडून अपेक्षा होत्या, पण भाईजानचा चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होऊनही 'छावा'वर मात करण्यात अयशस्वी ठरला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'ला सिनेरसिकांनी भरभरून प्रेम दिलं. यामध्ये विक्की कौशलनं छत्रपती शंभू राजांची भूमिका साकारली होती. तर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली होती. अशातच, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला होता.
थिएटरमध्ये 'छावा' रिलीज होऊन तब्बल 52 दिवस लोटले आहेत. अशातच आता ओटीटी सब्स्क्रायबर्स 'छावा' कधी रिलीज होणार याची वाट पाहत आहेत. अनेकजण असेही आहेत, ज्यांनी 'छावा' थिएटरमध्ये पाहिला आहे. पण, तरीसुद्धा त्यांना पुन्हा एकदा ओटीटीवर पाहायचा आहे. 'छावा' ओटीटीवर कधी रिलीज होणार? याची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
'छावा'चा 600 कोटींच्या क्लबमध्ये थाटात प्रवेश
यावर्षीचा कोणताही चित्रपट 'छावा'शी स्पर्धा करू शकलेला नाही. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाकडून अपेक्षा होत्या, पण भाईजानचा चित्रपट तसं करण्यात यशस्वी ठरला नाही. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला चित्रपटप्रेमींनी खूप प्रेम दिलं. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, विक्की कौशलचा सुपरहिट चित्रपट 'छावा' लवकरच ओटीटीवर येणार आहे. चित्रपटाचं थिएटर रन संपल्यानंतर लवकरच निर्माते ओटीटीवर चित्रपटाचा प्रीमियर करतील. 'छावा' 11 एप्रिल रोजी (Chhaava OTT Release Date) या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. दरम्यान, अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, 'छावा' या चित्रपटानं पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले होते. यासह, पहिल्या आठवड्यात 'छावा'चं कलेक्शन 219.25 कोटी रुपये झालं आहे. यानंतरही, 'छावा' काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि बॉक्स ऑफिसवर सतत धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटानं 600 कोटींचा टप्पाही ओलांडला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :