Chinmayee Sumeet: मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत (Chinmayee Sumeet) आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अभिनेत्री (Actress) सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर आपले परखड मत मांडत असतात. विविध मुद्द्यांवर अभिनेत्री भाष्य करते. काही वर्षांपासून मराठी भाषेचा मुद्दा तापलेला आहे. मुख्य म्हणजे रिक्षा चालकांना (Auto Drivers) मराठी भाषा येणं अनिवार्य असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता चिन्मयी सुमीत (Chinmayee Sumeet on Marathi)  यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  'फक्त रिक्षा वाल्यांना पकडायचं. त्यांना धाक दाखवायचा आणि बाकीच्या लोकांना सोडून द्यायचं. कारण ते उच्च पदस्थ आहेत', असं चिन्मयी सुमीत म्हणाल्या.  मराठी भाषेच्या सक्तीवरुन अभिनेत्री चिन्मयी सुमीत नेमकं काय म्हणाल्या? पाहूयात.

Continues below advertisement

मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं थेट अन् परखड मत (Chinmayee Sumeet Speaks Out on Marathi Language)

चिन्मयी सुमीत यांनी अलिकडेच UCNNewsLiveला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात रिक्षा चालवणाऱ्या चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य असल्याच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. म्हणाल्या की, 'उद्या एखादा महाराष्ट्रातील व्यक्ती तेलंगणामध्ये गेला, किंवा तामिळनाडूमध्ये गेला, तेव्हा तिथे जाऊन  जर तो म्हणाला की, आम्ही ही भाषा शिकणार नाही कारण, मला मराठीचा अभिमान आहे.  तर, तेही बरोबर नाही'.

'पण फक्त रिक्षावाल्यांना पकडायचं, त्यांना धाक दाखवायचा आणि बाकीच्या लोकांना सोडून द्यायचं. कारण ते उच्च पदस्थ आहेत.  म्हणजे, अंबानींची मुलं मराठी बोलतात की नाही, याच्याबद्दल तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. अमिताभ बच्चन 4 वाक्य मराठी बोलणार नाही.  याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटणार नाही. पण जर ते बोललेच तर, तुम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचता.  अरे तुम्ही मराठी बोलायलाच पाहिजे. तुम्ही भाषा प्रेमी आहात. तु्म्ही लिंग्विस्टिक आहात. भाषा यायलाच हवी. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. विसंवादाचे नव्हे. याची जबरदस्ती का करावी?', असं चिन्मयी सुमीत म्हणाल्या. 

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Gold and Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 4 हजारांनी तर, चांदी 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर