Peeche Dekho Peeche Meme Star Ahmed Shah Brother Dies : सोशल मीडियाच्या या काळात कोणताही व्यक्ती, कधीही, कशामुळेही व्हायरल होऊ शकतो. एखादा डायलॉग किंवा एखादं व्हिडिओ...छोट्याश्या गोष्टीवरून सोशल मीडिया कोणालाही जगभरात लोकप्रिय बनवू शकतो. असं आपण नेहमीच पाहतो. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमधला एक छोटा मुलगा खूप प्रसिद्ध झाला होता. त्याचं नाव आहे अहमद शाह... अहमद शाह आपल्या “पीछे देखो, पीछे” या मीममुळे भारतातही खूपच लोकप्रिय झाला होता. मात्र हा हसरा, मनमुरादपणे खेळणारा मुलगा सध्या प्रचंड दुःखात आहे. कारण त्याच्या लहान भावाचं निधन झालंय. 

Continues below advertisement

अहमद शाह आपल्या गोड रूपाने आणि हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येकाला आपलंसं करून घेत असे. पण आता त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अहमदचा धाकटा भाऊ उमैअर शाहच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वजण हादरले आहेत. एवढ्या लहान वयात उमैरला नेमकं काय झालं आणि त्याचा मृत्यू कसा झाला, हे जाणून घेऊयात...

अहमदने इन्स्टाग्रामवरुन दिली भावाच्या निधनाची बातमी

भावाच्या निधनाच्या बातमीने अहमद शाह पूर्णपणे कोसळला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उमैरचे फोटो शेअर करून ही दुःखद बातमी दिली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं –“हे कळविण्यात येते की आमच्या कुटुंबातील छोटासा चमकता तारा, उमैर शाह सर्वशक्तिमान अल्लाहकडे परतला आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की, त्याच्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा..” दरम्यान, ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

Continues below advertisement

उमैरच्या मृत्यूचं कारण काय?

मोठ्या भावासारखाच उमैर शाहही सोशल मीडियावर लोकप्रिय होता. त्याला ‘शान-ए-रमजान’ या शोच्या किड्स सेगमेंटमध्येही पाहिलं गेलं होतं. उमैरच्या निधनामुळे या शोचे होस्ट वसीम बदामी यांना सुद्धा मोठा धक्का बसला.. त्यांनी शोक व्यक्त करताना त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट केलं. वसीम यांनी सांगितलं की, उमैरला उलटी झाली होती आणि ती फुफ्फुसात गेली. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास झाला आणि कार्डियोव्हॅस्क्युलर अरेस्ट आला. या कारणामुळे त्याला वाचवता आलं नाही. याआधीही, 2023 मध्ये अहमदने आपली धाकटी बहीण गमावली होती.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Journalist Dilip Thakur On Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकरांनी खरंच अमजद खान यांना 'कितने आदमी थे' डायलॉग कसा बोलायचा शिकवलं? ज्येष्ठ सिनेपत्रकार म्हणाला...