Journalist Dilip Thakur On Sachin Pilgaonkar: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Industry) महागुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन पिळगांवकरांनी (Sachin Pilgaonkar) आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी बालवयातच सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आजतागायत ते सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी अनेक अजरामर भूमिका केल्या. तसेच, गाजलेल्या सिनेमांमध्ये अभिनेता म्हणून काम केलंच, पण त्यासोबतच पडद्यामागची सूत्रंही सांभाळलीत. दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायक असलेल्या सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक सुपरडुपर हिट सिनेमे दिले. याबाबतचे अनेक किस्से ते आपल्या मुलाखतींमध्ये सांगत असतात. अशाच एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकरांनी अमजद खानला 'शोले'मधला गाजलेला 'कितने आदमी थे' डायलॉग बोलायला जमतच नव्हता, तेव्हा मी त्याला कानमंत्र दिला, असं वक्तव्य केलं होतं. अशातच आता त्यांचा हा दावा ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकरू यांनी खोडून काढला आहे. 

Continues below advertisement

'शोले' मधला प्रसिद्ध डायलॉग अमजद खान यांना व्यवस्थित बोलता येत नसल्याचं सांगितलं. ते ज्यावेळी डायलॉग बोलत होते, तो पातळ आवाजात ऐकू येत होता. पण, तो डायलॉग भारदस्त आवाजात हवा होता. त्यानंतर सचिन पिळगांवकरांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेलं आणि अमजद खान यांच्याकडून डायलॉग बोलून घेतला. त्यानंतर तोच डायलॉग खूप प्रसिद्ध झाला, असं महागुरूंचं मत आहे. तर, त्यांनी सांगितलेल्या याच किस्स्याबाबत बोलताना दिलीप ठाकूर यांनी शंका उपस्थित केली आहे. अमजद खान हे रंगभूमीवरचे अनुभवी अभिनेते होते. मग त्यांना आवाज कसा वापरायचा, ही साधी गोष्ट कळत नव्हती का? असा सवाल दिलीप ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

सचिन पिळगांवकरांनी सांगितलेला 'शोले' सिनेमावेळीचा 'तो' किस्सा? 

मराठी अभिनेते सचिन पिळगांवकरांनी सांगितलं की, "शोले सिनेमा आल्यानंतर अनेकांना असं वाटलं की, अमजदचा आवाज हा गब्बर सिंहचा आवाज वाटत नाहीय. तो थोडासा पातळ वाटतोय. त्याला मी माईकसमोर उभं केलं आणि आमचे सूद नावाचे तेव्हा रेकॉर्डिस्ट होते, असिस्टंट होते ते मंगेश देसाईंचे... त्यांना सांगितलं ट्रेबल एकदम बंद करदो और बेस बढादो...", 

Continues below advertisement

"मी अमजदला सांगितलं माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल... कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता... आणि पहिला डायलॉग "कितने आदमी थे..." आधी त्यानं वरच्या पट्टीत ओरडून म्हटलेलं... मी त्याला सांगितलं नाही, असं नाही... नीचे के सूर मे बोल... पट्टी पुरी नीचे कर... Because I Am A Singer Also... मला ऑक्टिम्स कळतात... त्यामुळे खालच्या सुरात बोल, कितने आदमी थे...", असं सचिन पिळगांवकर म्हणाले. 

दिलीप ठाकूर यांनी खोडला सचिन पिळगांवकरांचा दावा, काय म्हणाले? 

Kalakruti Media या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिलीप ठाकूर यांनी 'शोले' सिनेमाबाबत काही किस्से सांगितले. हे किस्से सांगत असताना त्यांनी मराठी सिनेसृष्टीचे महागुरू सचिन पिळगांवकर यांचाही उल्लेख केला. ते म्हणालेले की, "शोले चित्रपटाच्या क्रेडिट लिस्टमध्ये 7 जणांची नावं आहेत, पण त्यामध्ये पिळगांवकर यांचं नाव नाही. अमजद खान हे रंगभूमीवरचे कलाकार होते. पृथ्वी थिएटरमधील त्यांचं एक नाटक पाहूनच जावेद अख्तर यांनी त्यांचं नाव रेमेश सिप्पी यांना सुचवलं होतं. रंगभूमीवरून आलेल्या कलाकाराला हावभाव आणि आवाजाची पट्टी काय असावी? याचं सामान्य ज्ञान असतं. त्यामुळे सचिनजींनी जे म्हटलं त्यावर मी बोलायची काहीच गरज नाही... रमेश सिप्पी हे असे दिग्दर्शक होते, जे अशा प्रकारचा हस्तक्षेप करतील असं मला वाटत नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sachin Pilgaonkar On Amjad Khan Sholay Movie Dialogue: अमजद खानला 'कितने आदमी थे' डायलॉग बोलायला जमतच नव्हता, मी त्याला कानमंत्र दिला; महागुरु सचिन पिळगांवकरांनी सांगितला किस्सा