Parvathy Opens Up About Shooting Romantic Scene: सिनेसृष्टीतील अनेक गॉसिप्स सोशल मीडियात व्हायरल होतात. फिल्म इंडस्ट्री असो किंवा कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य, मनोरंजन सिनेसृष्टीत नेमकं काय घडतंय? याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. बरेच कलाकार वैयक्तिक आयुष्याबाबत बरेच खुलासे करतात. यामुळे ते कायम प्रकाशझोतात येतात. अलिकडेच साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्रीनं शूटिंगदरम्यानचा कटू अनुभव शेअर केला आहे. पीरियड्सच्या काळात तिनं अभिनेत्यासोबत रोमँटिक सीन केला असल्याचा खुलासा, अलिकडच्या मुलाखतीत केला आहे.  हा अनुभव अत्यंत वेदनादायक होता, असं अभिनेत्रीनं सांगितलं. 

Continues below advertisement

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पार्वती थिरुवोथू हिने अलीकडेच शूटिंगदरम्यान झालेल्या त्रासाबद्दल खुलासा केला आहे.  सिनेसृष्टीत यश मिळवणं काही सोपं नाही. बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः महिला कलाकारांना शूटिंगदरम्यान शारीरिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. असाच त्रास अभिनेत्री पार्वती थिरुवोथू हिला शूटिंगदरम्यान करावा लागला. हॉटरफ्लाय या प्लॅटफॉर्मवरील एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत पार्वती म्हणाली, "शूटिंगदरम्यान पीरियड्स सुरू होते.  याकाळात अभिनेता  धनुषसोबत रोमँटिक सीन करावा लागला होता.  हा अनुभव अत्यंत वेदनादायक होता", असं  अभिनेत्री म्हणाली.  

2013 मध्ये प्रदर्शित झालेला तामिळ चित्रपट 'मरियान'च्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला. मुलाखतीत पार्वती म्हणाली, "शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मला पाण्यात भिजत अभिनेत्यासोबत रोमँटिक सीन शूट करायचा होता.  या सीदरम्यान माझ्यावर सतत पाणी टाकलं जात होतं.  त्यावेळी मला आठवलं की माझ्याकडे बदलण्यासाठी अतिरिक्त कपडे नाहीत.  कपडे बदलण्यासाठी  मी दिग्दर्शकांकडे हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी मागितली. दिग्दर्शकाने परवानगी नाकारली", असं तिनं सांगितलं. पार्वतीने शेवटी दिग्दर्शकांना आपण पीरियड्समध्ये असल्याचं सांगितलं होतं. यानंतर दिग्दर्शक गोंधळून गेला.  त्यांना नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी, हे कळलंच नाही, असं अभिनेत्रीनं सांगितलं. 

Continues below advertisement

या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनं समाजात पीरियड्सभोवती असलेल्या मानसिकतेवरही भाष्य केलं आहे. "अशा काळात घरात सुद्धा वेगळी मानसिकता होती. पीरियड्सबाबत तिला लहानपणी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्या काळात तिला घराच्या एका कोपऱ्यात बसावं लागायचं आणि धुतलेल्या कपड्यांना स्पर्श करण्यासही मनाई होती", असं पार्वती म्हणाली. पार्वतीची ही मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिनं  केलेल्या खुलाशामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

डॅडी अरुण गवळीच्या मुलीचा मुंबईत पराभव; पती बिग बॉस फेम अक्षय वाघमारेची पत्नीसाठी भावनिक पोस्ट