Paresh Rawal : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. 'हेरा फेरी' (Hera Pheri) मधला बाबूराव असो वा 'मालामाल वीकली' मधला लीलाराम चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'हेरा फेरी' या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar) , सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचा  'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) हा दुसरा भाग 2006 मध्ये  रिलीज झाला. या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.  नुकत्याच एका मुलाखतीमध्ये, या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे का? असा प्रश्न परेश रावल यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला परेश यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.  


मुलाखतीमध्ये परेश रावल यांना प्रश्न विचारण्यात आला की, ''हेरा फेरी', 'अंदाज अपना अपना' या चित्रपटांचे सिक्वेल कधी रिलीज होणार? या सिक्वेलनमध्ये काम करण्यासाठी तुम्ही किती एक्सायडेट असाल?' या प्रश्नाला परेश यांनी उत्तर दिलं, 'मला जर पुन्हा धोती आणि चष्मा घालून तशी भूमिका करावी लागली तर मी फक्त पैशांसाठी एक्सायडेट असेल, त्यापेक्षा जास्त कोणत्याही गोष्टींसाठी एक्सायडेट नसेल.'
 
पुढे परेश रावल यांनी सांगितलं, 'लगे रहो मुन्ना भाई हा चित्रपट सिक्वेल्सचे उत्तम उदाहरण आहे. चित्रपटांचे सिक्वेल्स असेच असले पाहिजेत. जर आम्ही हेरा फेरीचा सिक्वेल कूप वर्षानंतर तयार केला आणि त्यामध्ये तेच जुने जोक्स वापरले तर तो चित्रपट प्रेक्षकांना आवडणार नाही. त्यामध्ये काही बदल करावे लागतील. जर बदल झाले तरच मी एक्सायडेट असेल. ' काही दिवसांपूर्वी परेश रावल यांचा शर्माजी नमकिन हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


हेही वाचा :