Pardesi Fame Top Model Became Bollywood Sensation: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेक अभिनेत्रींनी (Actress) आजवर आपल्या मेहनतीच्या आणि टॅलेंटच्या जोरावर आपलं नाव कमावलं आहे. आजवर अनेक अभिनेत्री प्रकाशझोतात आल्या आणि गेल्या, काही तर अगदी काही सेकंदांतच सेन्सेशन बनल्या आणि सिनेसृष्टीवर आपली छाप सोडली. पण, आता आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. आज ही अभिनेत्री 70 वर्षांची आहे आणि तिच्या एका गाण्यामुळे ती जोरदार चर्चेत आली. तिच्या स्वतःच्या व्हायरल गाण्यावर (Viral Song) तिनं डान्स केला आणि तिची चर्चा रंगली.   

वयाच्या सत्तरीत प्रकाशझोतात आल्यानंतर आता ही अभिनेत्री पुन्हा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. सत्तरी गाठलेली कधीकाळची ही सौंदर्यवती दिग्दर्शकाकडे फक्त एका मिनिटाची भूमिका मागतेय. ज्येष्ठ अभिनेत्रीनं 'धुरंधर'चे दिग्दर्शक आदित्य धर यांना त्यांच्या सिनेमात एका मिनिटाची भूमिका मागितली आहे. 

कोण आहे 'ही' बॉलिवूडची सौंदर्यवती?

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव कल्पना अय्यर. त्यांनी इंडस्ट्रीत अनेक हिट गाणी दिली. 'हरी होमी हरी', 'जब छाये तेरा जादू' आणि 'रंभा हो' सारख्या गाण्यांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीनं अलिकडेच एका कौटुंबिक लग्नात तिच्या स्वतःच्या 'रंभा हो' गाण्यावर डान्स केला आणि लगेच व्हायरल झाले.        

कल्पनानं तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडलेलं, केवळ बॉलिवूडच नाही तर देशही सोडला होता. ती मूळची तामिळनाडूची आहे आणि तिच्या पालकांनी पळून जाऊन लग्न केलं होतं आणि ते देव आनंदचे चाहते होते. म्हणूनच, देव आनंद यांचा पहिला चित्रपट 'कल्पना' वरून प्रेरित होऊन, त्यांनी आपल्या मुलीचं नाव 'कल्पना' ठेवलं. घरी आर्थिक अडचणींचा सामना करत असताना, कल्पना यांनी वयाच्या 12 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. तिचं पहिलं उत्पन्न 50 रुपये होतं. शाळेच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मुकेश शर्मा यांनी कल्पनाचं टॅलेंट ओळखलं आणि तिला त्यांच्यासोबत विमानात घेऊन गेले. त्यावेळी तिच्यासोबत एक नवविवाहित जोडपं (अमिताभ बच्चन आणि जया भादुरी) देखील विमानात होतं.

अनेकांनी कल्पना यांना ब्युटी टॅलेंट शोमध्ये भाग घेण्याचा सल्ला दिला आणि एक दिवस, कपडे आणि बूट उधार घेऊन, त्या 1975 मध्ये नेव्ही क्वीन सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाल्या आणि उपविजेती ठरल्या. यामुळे त्यांना फेमिनाकडून फोन आला आणि बॉलिवूडचं दार उघडलं. त्यांचा पहिला चित्रपट मनोकामना होता. त्यानंतर त्यांनी देव आनंदच्या 'लुटमार'मध्ये एक डान्स नंबर सादर केला. या यशाबद्दल बोलताना अभिनेत्रीनं सांगितलं की, तिचा असा कोणताही विचार नव्हता. 

कल्पना यांनी एकाच दिवसात चार चित्रपट साइन केले. 'कुदरत', 'प्यारा दुश्मन' आणि 'बॉम्बे का महाराजा'. हळूहळू, काम संपलं आणि तिनं टेलिव्हिजनवर काम करायला सुरुवात केली, 'कशिश' आणि 'जुनून' सारख्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागली. 1999 मध्ये 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाचं चित्रीकरण केल्यानंतर, ती दुबईला स्थलांतरित झाली. अभिनेत्रीनं स्पष्ट केलं की, तिला काहीही आवडत नाही. ती अविवाहित राहते. कल्पनाला फक्त एकच खंत आहे की, तिनं पैशाच्या मागे लागण्यात तिच्या भावंडांचा वेळ आणि प्रेम गमावलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan Co-Star Kalpana Iyer Wants Comeback: 27 वर्षांपासून फिल्मी पडद्यापासून गायब आहे, सलमान खानची 'ही' को-स्टार; आता वयाच्या सत्तरीत करायचंय कमबॅक