Salman Khan Co-Star Kalpana Iyer Wants Comeback: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका ज्येष्ठ महिलेचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'धुरंधर'मध्ये (Dhurandhar) वापरण्यात आलेल्या 80च्या प्रसिद्ध 'रम्बा हो' (Ramba Ho Ho Ho Song) गाण्यावर ही ज्येष्ठ महिला थिरकताना दिसली. तिच्या डान्स मूव्ह्सचं अनेकांनी भरभरून कौतुकही केलं. पण, अनेकांनी तिला ओळखलं नाही. ती ज्येष्ठ महिला म्हणजे, वयाची सत्तरी गाठलेली कधीकाळची सुपरस्टार अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना कल्पना अय्यर (Kalpana Iyer) होत्या. एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या.
कधीकाळी ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त कलप्ना अय्यरच्याच चर्चा होत्या, तिनं कठोर परिश्रम आणि समर्पणानं एक वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या 70 व्या वर्षी तिनं "रम्बा हो..." गाण्यावर त्यांच्या नृत्यानं सर्वांना चकित केलं. त्यांच्या डान्स व्हिडीओच्या रिलीजनंतर, सर्वांना त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यात रस आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आणि अनेक न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या शेवटच्या काही चित्रपटांमध्ये सलमान खानच्या 'हम साथ साथ हैं'चा समावेश आहे, ज्यामध्ये तिनं रीमा लागूच्या मैत्रिणीची भूमिका केली होती.
आयएएनएसशी बोलताना कल्पना अय्यर म्हणाली की, "मी फक्त 17 वर्षांची असताना नृत्याच्या जगात प्रवेश केला. त्यावेळी, ना आरामदायी ग्रीन रूम्स होत्या ना दुखापतीपासून बचाव करण्याच्या सुविधा. कधीकधी आम्हाला खरचटलेल्या आणि रक्ताळलेल्या पायांसह अनवाणी नाचावं लागायचं, पण आम्ही कधीही तक्रार केली नाही."
कल्पना पुढे बोलताना म्हणाल्या की, "रम्बा हो..." सारख्या सुपरहिट गाण्याच्या शुटिंग दरम्यान मला पायाला गंभीर दुखापत झालेली. तरीसुद्धा मी शुटिंग थांबवू शकली नाही. 'राजा हिंदुस्तानी' सारख्या फिल्ममध्येही माझ्या पायाला दुखापत होऊनही मी अनवाणी पायांनी डान्स केला. माझ्यासाठी त्यावेळी सर्वात महत्त्वाचं होतं काम आणि त्या संधीचं सोनं करणं, ज्या मला मिळत होत्या. त्यावेळी तक्रार करण्याची सवड नसायची... फक्त मेहनत करणं आणि पुढे जात राहण्याची जिद्द होती..."
"माझ्यासाठी डान्स फक्त एक परफॉर्मन्स नव्हता, तर एक साधना होती. ज्यावेळी तुम्ही एखाद्या कलेचा अंतःकरणापासून सन्मान करता, त्यावेळी शरीराच्या व्याधी आपसूक लहान भासू लागतात. डान्सनं मला न केवळ ओळख दिली, तर मला आयुष्याचा आनंदही दिलाय..."
आजच्या काळात नृत्याच्या बारकाव्यांकडे जास्त लक्ष दिलं जातं : कल्पना अय्यर
आजच्या पिढीतील कलाकारांबद्दल बोलताना कल्पना अय्यर म्हणाल्या की, "कोणत्याही युगाची तुलना करणं अन्याय्य आहे. मला वाटतं की, आजच्या अभिनेत्री आणि डान्सर्सनाही कठोर परिश्रम करावे लागतात. आजच्या काळात नृत्याच्या बारकाव्यांकडे जास्त लक्ष दिलं जातं. निर्माते कलाकाराची तयारी, कपडे, लूक आणि सादरीकरणात मोठी गुंतवणूक करतात. कलाकार जितकी मेहनत घेतो तितकाच पैसा त्यांच्यावर खर्च होतो."
"जब छाये मेरा जादू" आणि "हरी ओम हरी" सारख्या अनेक हिट गाण्यांचा आणि चित्रपटांचा संदर्भ देत कल्पना म्हणाल्या की, "मी माझ्या कारकिर्दीबद्दल पूर्णपणे समाधानी आहे. आता मी माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी तयार आहे. जर भूमिका माझ्या वयाला आणि आरामदायी पातळीला अनुकूल असेल, तर मी आजी किंवा पणजीची भूमिका करण्यास मागेपुढे पाहणार नाही."
कल्पना अय्यर यांनी "रम्बा हो..." या गाण्याबद्दलच्या जुन्या अफवांनाही खोडून काढलं. ती म्हणाली, "हे गाणं गोव्यात चित्रित झालेलं नाही, तर मुंबईतील नटराज स्टुडिओमध्ये चित्रित झालेलं. हे चित्रीकरण प्रसिद्ध निर्माते रामानंद सागर यांच्या कार्यालयासमोरील एका डान्स स्टुडिओमध्ये झालेलं..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
