Parag Tyagi On Shefali Jariwala Death: 'काँटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) मृत्यूला जवळजवळ अडीच महिने झाले आहेत. पण, आजही तिच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा रंगतात. कुणी म्हणतं, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला, तर कुणी म्हणतं, तिच्या मृत्यूसाठी ती घेत असलेल्या अँटीएजिंग ट्रिटमेंट कारणीभूत आहेत. त्यामुळे शेफालीचा मृत्यू नेमका कसा झाला? तिच्या मृत्यूच्या दिवशी रात्री नेमकं काय घडलेलं? यांसारखे प्रश्न आजही कायम आहेत. अशातच आता शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीनं (Parag Tyagi) तिच्या निधनाच्या अडीच महिन्यांनी, त्या रात्री नेमकं काय घडलेलं? याबाबत सविस्तर सांगितलं आहे.
पराग त्यागी 27 जून 2025 ची रात्र कधीच विसरणार नाही. तीच काळी रात्र होती, जेव्हा त्याची पत्नी आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालेलं. ती त्यांच्या घरी बेशुद्ध पडलेली. परागनं तिला तातडीनं रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूपच उशीर झालेला. यानंतर तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अनेक तर्क समोर आले. आता, पराग त्यागीनं शेफालीच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलेलं? याबाबत सविस्तरपणे सांगितलं आहे. पराग त्यागीनं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्या चॅनलवर त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे.
शेफालीच्या मृत्यूच्या दिवशी रात्री काय घडलेलं?
पराग त्यागीनं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे, ज्याला त्यानं 'हमारी अधुरी कहाणी' असं नाव दिलं आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं? शेफाली जरीवालाला काही त्रास होत होता का? तिच्यात काही बदल जाणवला का? असं विचारलं असता, पराग त्यागीनं सांगितलं की, "नाही, तिच्या स्वभावात काही बदल झाला नाही, पण मला थोडसं आतून वाटत होतं की, काहीतरी घडणार आहे. म्हणजे, कदाचित सिम्बाचं काहीतरी होईल किंवा आणखी काहीतरी... मी हनुमानाचा भक्त आहे, म्हणून मला थोडीशी आतून कुणकूण लागते..."
पराग त्यागी पुढे म्हणाला की, "मला आठवतंय की, आम्ही दिवसभर माता राणीची पूजा केली होती आणि मी जशी बिल्डिंगमध्ये एन्ट्री केली, ती मला म्हणाली, आपण एक काम करुयात... त्यादिवशी पूजा होती, त्यामुळे आमच्या घरातला हेल्पर राम खूप थकलाय, म्हणून तू सिम्बाला फिरायला घेऊन जा..."
पराग पुढे म्हणाला की, "मी शेफालीला म्हणालो, ठीक आहे, मी त्याला घ्यायला वरती घरी येतो. तर शेफाली म्हणाली, नको, नको, मी रामला पाठवते. तो त्याच्या मित्रांशी बोलेल आणि तू सिम्बाला फिरायला घेऊन जा आणि मग वर ये... मी म्हणालो, 'ठीक आहे.' मी पुन्हा फोन केला. मी पार्किंगमधील गार्डला फोन केला. रामनं सिम्बाला घरी आणल्यानंतर फक्त 3-4 मिनिटांनी, मला मेल कंपाउंडरचा फोन आला की, 'भाई, दीदीला काहीतरी झालं आहे.' मी लगेच सिम्बासोबत पळत वर घरी गेलो..."
परागच्या म्हणण्यानुसार, मेल कंपाउंडरनं त्याला सांगितलं की, शेफालीला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ती बेशुद्ध पडली होती. हे सर्व तीन मिनिटांत घडलं. मी कदाचित खूप जास्त वेळ बोलत आहे, अगदी तीन मिनिटांतही नाही... खाली उतरण्यासाठी सुमारे दीड मिनिटं लागली आणि नंतर कदाचित अर्धा मिनिट लागला. त्या दरम्यान, तिचा रक्तदाब कमी झाला आहे का? ते मी तपासले. मी तिला इलेक्ट्रोलाइट पाणी देण्याचा प्रयत्न केला. मी सीपीआर दिला आणि तिचा श्वासोच्छवास ठीक वाटत होता. जेव्हा मला वाटलं की, ती श्वास घेत आहे, तेव्हा मी ताबडतोब डॉक्टरकडे धाव घेतली. मी तिची नाडी तपासली, पण तिनं डोळे फिरवले... फक्त एकच गोष्ट होती की, श्वास घेण्याचे दोन आवाज येत होते. पण तिनं पूर्णपणे हार मानली होती. मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते नाही जमलं. मी जेव्हा जेव्हा तिला माझ्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिचे डोकं उलटे व्हायचं. जेव्हा आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी तिला मृत घोषित केलं..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :